esakal | आरोग्य विभागाचा मनमानी कारभार; ग्रामपंचायतींना कोरोना रुग्णांची माहितीच मिळेना!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Patients

ग्रामपंचायतीकडून संबंधित गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना कळविले जात होते. त्यामुळे सोसायटी आणि गावांमध्ये कोरोना बाधित रुग्णावर सुरु असलेल्या उपचाराबाबत माहिती मिळत होती. ​

आरोग्य विभागाचा मनमानी कारभार; ग्रामपंचायतींना कोरोना रुग्णांची माहितीच मिळेना!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्हा आरोग्य विभागाकडून हवेली तालुक्यात शहरालगतच्या गावांमध्ये किती कोरोना बाधित रुग्ण आहेत, याची माहिती ग्रामपंचायतींना वेळेवर दिली जात नाही. त्यामुळे गावात नेमके काय चालले आहे, यापासून ग्रामपंचायत पदाधिकारीही अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.

हवेली तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. शहरालगतच्या ग्रामीण भागात एखादा कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास त्याबाबत जिल्हा आरोग्य विभागाकडून संबंधित ग्रामपंचायतीला माहिती दिली जात होती. तो परिसर किंवा गृहनिर्माण सोसायटी कंटेनमेंट झोन म्हणून सील करण्यात येत होती. संबंधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात येत होते.

Video : पुणेकर संकटात, हॉस्पिटलमध्ये जागाच नाही, तर उपचार घ्यायचे कुठे?

ग्रामपंचायतीकडून संबंधित गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना कळविले जात होते. त्यामुळे सोसायटी आणि गावांमध्ये कोरोना बाधित रुग्णावर सुरु असलेल्या उपचाराबाबत माहिती मिळत होती. तसेच, बाधित रुग्णांकडून होम क्वारंटाईनचे पालन होते आहे की नाही याबाबत लक्ष देणे शक्य होते. काही रुग्ण कोरोनाची लक्षणे आढळून खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

अशा परिस्थितीत जिल्हा आरोग्य विभागाने आता ग्रामपंचायतीला किंवा संबंधित गृहनिर्माण सोसायट्यांना कोरोना बाधित रुग्ण असल्याचे कळविणे बंद केले आहे. त्यामुळे गावात नेमके किती रुग्ण आहेत याबाबत संभ्रमाची स्थिती आहे. आरोग्य विभाग, ग्रामपंचायत आणि गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

काय सांगता! पुणे झेडपीला डाॅक्टर्स अन् नर्स मिळेनात!​

लॉकडाऊन जाहीर झालेल्या ग्रामपंचायती
हवेली तालुका :
 
वाघोली, केसनंद, आव्हाळवाडी, मांजरी बुद्रुक, कदमवाकवस्ती, पिसोळी, लोणीकाळभोर, उरुळीकांचन, कुंजीरवाडी, औताडे, हांडेवाडी, वडकी, नांदेड, किरकिटवाडी, खडकवासला, गोर्हे बुदुक, गोर्हे खुर्द, डोणजे, खानापुर, थेऊर.
मुळशी तालुका : 
नांदे, भुगाव, भुकुम, पिरंगुट, घोटावडे, हिंजवडी 

हवेली तालुक्यात सर्वाधिक रुग्ण :
हवेली तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वाधिक 1196 बाधित रुग्ण आहेत. तर, जुन्नर 197, शिरूर 156, मुळशी 277, वेल्हा 49, आंबेगाव 116, मावळ 175, खेड 341, पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागात 104 बाधित रुग्ण आहेत. बारामती शहर आणि तालुक्यात 66, दौंड शहर आणि तालुक्यात मिळून 231 आणि इंदापूर तालुक्यात 76 रुग्ण आढळून आले आहेत.

धक्कादायक ! देशासाठी फासावर गेलेल्या सुखदेव यांच्या बलिदानाचा बालभारतीला पडला विसर​

गावात एखादा कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात नाहीत. ग्रामपंचायतीला रुग्णांबाबत माहिती दिली जात नाही. बाधित व्यक्तीला रूग्णालयात दाखल करण्यासाठी सतत फोन करावे लागतात.
- मच्छिंद्र दगडे, सरपंच, पिसोळी (ता. हवेली)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)