लष्करी हद्दीत रस्ता रुंदीकरणाला ग्रीन सिंग्नल

Road-Work
Road-Work

पुणे - चांदणी चौकातील नियोजित उड्डाण पुलाच्या कामाचा भाग म्हणून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून, या रस्त्यावर आवश्‍यक ती कामे करण्यास संरक्षण मंत्रालयाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. त्याशिवाय, लोहगाव विमानतळ येथील पार्किंग, विमानतळ परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरणही होणार आहे. 

शहरातील विविध प्रकल्पांतर्गत लष्कराच्या ताब्यातील जमीन, लोहगाव विमानतळावरील पार्किंग, हवाई दलाकडील जमीन, पालखी मार्गाचे विस्तारीकरण या कामांच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बैठक घेतली. या बैठकीला खासदार गिरीश बापट यांच्यासह महापालिका व विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. 

चांदणी चौकातील दुमजली उड्डाण पुलासाठी त्या भागातील रस्त्यांच्या रुंदीकरण्याचे नियोजन आहे. मात्र काही जागा लष्कराच्या ताब्यात असल्याने त्यासाठी परवानगी आवश्‍यक आहे. ती मिळाल्याने पुलासह तेथील कामे हाती घेण्यात येणार आहेत. 
बापट म्हणाले, ‘‘शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी वाहतूकमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. त्यामुळे चांदणी चौक आणि लोहगावमधील कामे सुरू होतील. चर्चेनुसार संरक्षण खात्याला मोबदला देण्याची प्रक्रिया लवकर करू.’’

विमानतळासमोरील जागा पार्किंगसाठी
लोहगाव विमानतळ परिसरात पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. पार्किंगला जागा नसल्याने प्रवासी आणि वाहनचालकांची गैरसोय होते. 

त्यानुसार विमानतळासमोरील साडेतीन एकर जागा देण्यास संरक्षण दलाने मंजुरी दिली. त्यामुळे पार्किंग आणि रस्ता रुंदीकरणही करता येणार आहे. संरक्षण दलाकडून जागा मिळाल्यानंतर संरक्षण दलाला त्या मोबदल्यात बांधकाम करून देण्याची अट मान्य करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com