'बॉईज लॉकर रूम' प्रकरणानंतर सीबीएसईला आली जाग; सायबर सुरक्षिते'बाबत घेतला 'हा' निर्णय

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal
सोमवार, 25 मे 2020

"सायबर सुरक्षिते'बाबत सीबीएसईतर्फे माहिती पुस्तिकेद्वारे मार्गदर्शन
- "बॉईज लॉकर रूम' प्रकरणानंतर सीबीएसईला आली जाग
- विशेषत: नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी डिजीटल जबाबदारीचे धडे

पुणे : दिल्लीतील किशोरवयीन मुलांनी घडवून आणलेल्या "बॉईज लॉकर रूम' प्रकरणानंतर काहीशी उशिरा का होईना, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला (सीबीएसई) जाग आली. म्हणूनच आता किशोरवयीन मुलांकडून सोशल मिडियाचा होणारा गैरवापर टाळण्यासाठी सीबीएसईने "सायबर सेफ्टी'या मार्गदर्शक पुस्तिकेद्वारे (हॅण्डबुक) सायबर सुरक्षितेबाबत नियमावली प्रसिद्धी केली आहे. याद्वारे इंटरनेटच्या वापर करताना काय काळजी घ्यावी, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये मार्गदर्शन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

काही दिवसांपूर्वी दिल्लीत "बॉईज लॉकर रूम' हे प्रकरण गाजले. त्यातून साधारणत: १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांकडून इंटरनेटचा चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या वापराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. त्यात लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचा ई-लर्निंग, ऑनलाईन क्‍लासेस, इंटरनेटवरील शैक्षणिक साहित्य यानिमित्ताने इंटरनेटवरील वावराचा काळ वाढला आहे. त्यामुळे इंटरनेटच्या वापराबाबत आणखीनच चिंता सध्या सातावत आहे. नेमकं हेच विचारात घेऊन "सीबीएसई'ने आता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना डिजीटलवर वावरताना आपली जबाबदारी ओळखून कसे वागावे, याचे धडे या पुस्तिकेद्वारे दिले आहेत. सोशल मिडियाचा गैरवापर आणि सुडबुद्धीने केलेल्या अश्‍लिलतेबाबत (रिव्हेंज पोर्नोग्राफी) या पुस्तिकेद्वारे विद्यार्थ्यांना सावध केले आहे.

- विद्यार्थ्यांनो, रोजगार निर्मितीसाठी पुणे विद्यापीठाचा घेतला 'हा' निर्णय

इंटरनेटवर शेअरिंग करताना घ्या ही काळजी :
- तुम्ही ऑनलाईन साधलेल्या संवादाला तुम्हीच जबाबदार असाल.
- कोणतीही माहिती फॉरवर्ड किंवा पोस्ट करताना त्यांची सत्यता पडताळून पहा
- आक्षेपार्ह आणि अश्‍लिल पोस्ट शेअर करणे टाळा
- तुमच्या वैयक्तिक माहितीचा वापर तुमच्याच विरोधात होऊ शकतो. त्यामुळे ऑनलाईन माहिती देताना दक्षता घ्या
- विश्‍वासार्ह स्त्रोताचा वापर करून माहिती डाऊनलोड करा.

- Video : लंडनमध्ये अडकले होते...पैसे संपले...व्हिसाची मुदतही, पण...

'सायबर सेफ्टी' पुस्तिकेचे वैशिष्ट्ये :
- डिजीटल साक्षरता, शिष्टाचार, सुरक्षेची सविस्तर माहिती.
- इंटरनेटचा जबाबदारीपुर्वक वापर करण्याच्या सुचना
- गैरप्रकार घडल्यास किंवा ते रोखण्यासाठी आवश्‍यक संपर्क क्रमांक, स्त्रोतांची यादी

- Video : लंडनमध्ये अडकले होते...पैसे संपले...व्हिसाची मुदतही, पण...

ऑनलाईन गेम खेळताना असे ठेवा स्वत:ला सुरक्षित :
- गेम निवडताना वयोगटाची अट तपासून घ्या
- विनामुल्य असणारे गेम डाऊनलोड करणे टाळा
- एखाद्या क्‍लिकवर, मेसेस किंवा लिंकद्वारे आलेले गेम डाऊनलोड करू नका
- तुमची वैयक्तिक माहिती (उदा. नाव, जन्म तारीख, पत्ता, फोन नंबर) गेम खेळताना कधीही शेअर करू नका
- तुमचा पासवर्ड कोणासमवेत शेअर करणे टाळा
- गेमच्या पूर्णपणे आहारी जात असाल, तर वेळीच सावध व्हा.

Big Breaking : आता कॉलेजही भरणार शिफ्टमध्ये; केंद्रीय मंत्र्यांचे वक्तव्य!

नेमकं काय आहे "बॉईज लॉकर रूम' प्रकरण :
इस्टाग्रामवर "बॉईज लॉकर रूम' नावाचे अकांऊट खुलण्यात आले होते. यात दिल्लीत एका नामांकित महाविद्यालयातील अकरावी, बारावीची मुले आहेत. मुलींबद्दल विकृती निर्माण करण्याचे काम या ग्रुपमध्ये सुरू होते. शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या या ग्रुपमध्ये मुलींचे अश्‍लिल फोटो व्हायरल होत होते. त्याबद्दल ग्रुपमध्ये चर्चा व्हायची. या अकांऊटबाबत दक्षिण दिल्लीत राहणाऱ्या एका मुलींने पोस्टवर लिहिले. ही बाब दिल्ली महिला आयोगापर्यंत पोचली. आयोगाने इस्टाग्राम आणि दिल्ली पोलिसांना नोटिस बजावली आणि संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी हे अकांऊट बंद केले. तसेच संबंधित मुलांवर गुन्हा नोंदविण्यात आला. या मुलांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guide through cyber security information book by CBSE