Video : पुण्यात पुन्हा कोसळले होर्डिंग...अन् काळजाचा चुकला ठोका

Hoarding collapse at moshi in Pune
Hoarding collapse at moshi in Pune

मोशी : येथील श्री नागेश्वर महाराज चौकामध्ये भरत असलेल्या मंडईलगत उभारलेला एक होर्डिंग प्रवासी रिक्षांवर कोसळला. होर्डिंग पडताना झालेला आवाज आणि तो पडताना पाहणाऱ्यांनी केलेला आरडाओरडा त्यामुळे तेथील उपस्थितीतांची घाबरुन धांदल उडाली. ही घटना बुधवारी (ता. ८) घडली.

पुण्यात झोमॅटोची ऑर्डर मिळण्यास अडचण; कारण...
 

दरम्यान, या अचानक घडलेल्या प्रकारामुळे मागील वर्षी पुण्यातील जुन्या बाजार चौकात होर्डिंग कोसळलेल्या अपघातीची क्षणभर आठवण झाली. मात्र येथील होर्डिंग आकाराने लहान असल्याने याठिकाणी कोणालाही दुखापत अथवा जीवितहानी झाली नाही.

वर्दळीच्या असलेल्या पुणे-नाशिक मार्ग व मोशी आळंदी चौकामध्ये दररोज भाजी विक्रेते भाजी विकण्यासाठी तर रिक्षावाले ग्राहकांच्या प्रतिक्षेत थांबतात. एका खासगी कोचिंग क्लासेसचा निव्वळ बांबूच्या आधारावर लावण्यात आलेला होर्डिंग जवळच उभ्या असलेल्या रिक्षांवर कोसळला. अचानक झालेल्या या घटनेमुळे त्या ठिकाणच्या सर्वांचीच धावपळ झाली.

कोराई गडावर रात्री मुक्काम करणे विद्यार्थ्यांना पडले महागात; वाचा काय घडले?​

होर्डिंगच्या फ्रेमला लोखंडी पट्ट्या होत्या. बाजूला आधार म्हणून फक्त लाकडी वासे लावण्यात आली होते. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. भीतीचे वातावरण मात्र कायम होते. यावेळी स्थानिकांसह वाहनचालकांनीही पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला असून असे रस्त्याच्या कडेला तसेत विनापरवानगी होर्डिंग लावणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही. असा संतप्त प्रश्न उपस्थित केला. 

सारथी संस्थेसाठी खासदार संभाजीराजे आक्रमक; घेतला मोठा निर्णय!

पुणे शहरातील कोसळलेल्या होर्डिंग दुर्घटनेमध्ये मोशीतील ही एका व्यक्तीचा समावेश होता याची आठवण मोशीकरांना यानिमित्ताने झाली आहे. त्यामुळे मोशीतील श्री नागेश्वर महाराज चौक, भारत माता चौक, उपबाजार चौक आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असे लहान आकारासह महाकाय आकाराचे होर्डिंग उभारलेले आहेत. यामधील किती होर्डिंग अधिकृत आणि किती अनधिकृत आहेत हा संशोधनाचा विषय समोर आला आहे.

पुणे : अजित पवार, भरणे यांच्या मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर लाडू वाटून जल्लोष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com