पोलिसांनी 'त्या' दोन बहाद्दरांना पकडताच त्यांच्याकडे काय सापडले ते पाहा...

pol.jpg
pol.jpg

हडपसर : कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी, घरफोडी चोरी, तसेच दुचाकी चोरणा-या आरोपींकडून १५ मोबाईल, ०५ दुचाकी, ०२ कोयते व रोख रक्कम असा एकुण ४ लाख १५ हजार ३१० रूपयांचा मुद्देमाल हडपसर पोलिसांनी हस्तगत केला.

याप्रकरणी अभिजीत अशोक रणदिवे ऊर्फ दादया (वय २०, रा. म्हाडा कॉलनी, बिल्डींग नं. १२, रुम नं. १२, सुरक्षानगर, हडपसर) व विशाल संजय लोखंडे, वय १९, रा. भोसले चिकन सेंटर समोर, अंधशाळेजवळ, रामटेकडी, हडपसर) या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 

हडपसर पोलिस स्टेशनकडील तपास पथकातील अधिकारी संजय सहाय्यक पोलिस निरिक्षक चव्हाण व कर्मचारी पोलिस नाईक नितीन मुंडे, पोलिस शिपाई शशीकांत नाळे, प्रशांत टोणपे हे जबरी चोरी, घरफोडी चोरी, वाहन चोरी चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्याकरीता अचानकपणे वाहन चेकींग व संशयीत इसमांचा तपास करीत होते.

दरम्यान, ससाणेनगर कॅनॉलवरील रस्त्यावर दुध विक्रेत्याला कोयत्याचा धाक दाखवून त्यास लुटणारे दोन व्यक्ती हे त्यांचे जवळील लाल रंगाच्या मोटार सायकलवर पुरोहित स्वीट होम चौकात येणार असल्याची बातमी मिळाल्याने, तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ सदर ठिकाणी जावून नाकाबंदी करुन वाहन तपासणी करीत असताना वरील वर्णनाच्या दोन व्यक्ती हे भरधाव येत असताना तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना दिसले. त्यांनी त्यांना थांबविण्याचा इशारा केला असता, ते दोन व्यक्ती त्यांचेकडील मोटार सायकलवरुन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना ते खाली पडले. तेव्हा तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी क्षणाचा ही विलंब न करता त्या दोन्ही आरोपींना जागीच पकडून त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे वरिल मुद्देमाल मिळाला. तेव्हा त्यांनी गुन्हा केला असल्याचे कबूल केला. 

अटक आरोपींकडे तपास केला असता त्यांनी यापुर्वी हडपसर परिसरातील पोस्ट ऑफिस फोडण्याचा प्रयत्न केल्याचा, घरफोडी केल्याचा तसेच वाहन चोरी केल्याची तसेच रात्रीच्या वेळेस वाहनचालकांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतल्याची कबुली दिली आहे.

त्यांच्याकडून हडपसर पोलिस स्टेशनकडील जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरी असे एकुण ५ गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच त्यांचेकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोन व इतर दुचाकी वाहनांचा तपास चालू आहे. दोन्ही आरोपी हे पुणे शहर आयुक्तालयाच्या रेकॉर्डवरील आरोपी असून, त्यांच्यावर यापुर्वी वेगवेगळया पोलिस ठाण्यामध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक रमेश साठे यांनी दिली.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com