19 वर्षे मंत्रिपद भूषविलेले हर्षवर्धन पाटील यांना भाजपकडून...

डाॅ. संदेश शहा
शनिवार, 4 जुलै 2020

हर्षवर्धन पाटील यांना प्रदेश कार्यकारिणीवर घेण्यात आल्याने 
 इंदापूर तालुक्यात येथून पुढे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी भाजपमध्ये सामना रंगणार आहे.

 इंदापूर (पुणे) : माजी संसदीय व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली. 

पेट्रोल- डिझेलच्या दरावरून पुणेकरांना असाही दिलासा...

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल मुंबईत नूतन कार्यकारिणीची घोषणा केली. त्यामध्ये महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या भाजप कार्यकारिणीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची निवड करण्यात आली. त्यामुळे इंदापुरात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला असल्याची माहिती भाजप तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे व शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी दिली.

कोंढापुरीत पर्यावराणासाठी झटताहेत ग्रामस्थ

हर्षवर्धन पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळात 19 वर्षाहून जास्त विविध खात्याचे मंत्री म्हणून काम केले असून, त्यांचे महाराष्ट्रातील राजकारणामध्ये मोठे योगदान आहे. इंदापूर तालुक्यात त्यांच्या विचाराचे दोन साखर कारखाने, तीन शिक्षण संस्था, एक बाजार समिती, एक बँक व वाहतूक संस्था आहे. 

कोरोनाचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याचे एेकूनच आला हार्ट अॅटॅक

हर्षवर्धन पाटील हे विधानसभा निवडणुकीत अल्प मताने पराभूत झाले होते. त्या वेळेपासून त्यांचे राजकीय पुनर्वसन करावे, अशी तालुका भाजपची मागणी होती. त्यांना प्रदेश कार्यकारिणीवर घेण्यात आल्याने तालुक्यात येथून पुढे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी भाजपमध्ये सामना रंगणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harshvardhan Patil elected as Special Invited Member on Maharashtra Pradesh BJP Executive