
पुणे : भांडवलासाठी दहा हजार रुपये देण्याची केंद्र सरकारने केलेली घोषणा कागदावरच राहिल्याने पथारी व्यावसायिकांना पुन्हा उभे करण्यासाठी वंचित विकास संस्था आणि जाणीव हातगाडी, फेरी, पथारी स्टॉलधारक संघटनेने पुढाकार घेतला आहे. पथारी व्यावसायिकांना दोन ते दहा हजार रुपयांपर्यंतचे भांडवल देण्याचा विचार या दोन्ही संघटनांकडून सुरू करण्यात आला आहे. त्यामध्येही पहिल्या टप्प्यात अत्यंत गरजू व्यक्ती, विधवा, अपंग व्यक्तींना भांडवल देण्यात येणार आहे.
पुणे- मुळशी प्रवास करताय? सावधान...
कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून पथारी व्यावसायिकांचा व्यवसाय बंद पडला आहे. लॉकडाऊनच्या काळात जवळ जी शिल्लक होती. ती देखील संपली. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पथारी व्यावसायिकांना दहा हजार रुपयांचे भांडवल देण्याची घोषणा गेल्या महिन्यात केली होती. मात्र अद्याप ही पथारी व्यावसायिकांना हे पैसे मिळाले नाही. त्यामुळे उधारी करून, कर्ज घेऊन तर काही पथारी व्यावसायिकांनी सोने गहाण ठेवून व्यवसायासाठी भांडवल उभारत असल्याचे समोर आले आहे.
मोटार विहिरीत कोसळून महिलेसह दोन बालकांचा मृत्यू
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता वंचित विकास संस्था आणि जाणीव हातगाडी, फेरी, पथारी स्टॉलधारक संघटनेने आपल्या सभासदांच्या मदतीला धावून जाण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी दोन ते दहा हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे, असे जाणीवचे कार्यवाह संजय शंके यांनी सांगितले.
उरुळी कांचनमधील महिला राजकीय पदाधिकारी कोरोना पाॅझिटिव्ह
जाणीव संघटनेचे 18 हजार 380 सभासद आहेत. त्या सर्व सभासदांना मदत करणे संघटनेला शक्य नाही. परंतु अत्यंत गरजू, विधवा आणि अपंग सभासदांना प्राधान्य दिले जाणार आहे. अधिकाधिक पथारी व्यावसायिकांना मदत करता यावी, यासाठी समाजातील काही दानशूर व्यक्ती अथवा संस्थांनी या कार्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मदत करू इच्छिणाऱ्यांनी संघटनेच्या 9422029808 किंवा 9850529808 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
पुण्याच्या इतिहासातील 'ती' काळी तारीख...ढगफुटी...आंबिल ओढा..अन्...
केंद्र सरकारकडून अद्याप मदत मिळालेली नाही. पथारी व्यावसायिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यांना पुन्हा उभे राहता यावे, यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. त्यामुळे ज्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी भांडवले लागते. अशांना मदत करण्याचा विचार संघटनेकडून सुरू आहे. त्यामध्येही महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी या कामासाठी पुढे यावे, हतबल झालेल्या पथारी,फेरीवाले व्यावसायिकांना पुन्हा उभे राहणे शक्य होणार आहे.
- सुनीता जोगळेकर (संचालिका, वंचित विकास संघटना)
पुणे शहरात एकूण फेरीवाल्यांची संख्या 48 हजार
संघटनेचे सभासद असलेल्यांची संख्या 18 हजार 380
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.