ईदनिमित्त मुस्लीम बांधवांनी केलेल्या या कामाचे होत आहे कौतुक 

junnar
junnar

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुका मुस्लिम सेवा समितीने बकरी ईदच्या निमित्ताने लेण्याद्री कोविड केअर सेंटरचे सर्व आरोग्य कर्मचारी व तालुक्यातील मौलाना यांना मास्क, फेस शिल्ड, हॅडग्लोज, सॅनिटायझर पेन, सॅनिटायझर व साबण, अशा आरोग्य सुरक्षा किटचे वाटप केले असल्याची माहिती समितीचे सहसचिव अशफाक पटेल यांनी दिली   

याप्रसंगी तहसीलदार हनुमंत कोळेकर, तालुका आरोग्य अधिकारी उमेश गोडे, लेण्याद्री कोविड सेंटरचे डाॅ.शाम बनकर, कोविड सेंटर डाॅक्टर, नर्सेस व जुन्नर तालुका मुस्लिम समाज सेवा समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. अंजुमन हायस्कूल जुन्नर येथे शहरातील मौलाना यांना कोरोना आरोग्य सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. तहसीलदार कोळेकर यांनी कोविड सेंटरला समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन या वेळी केले.

समितीचे सहसचिव अशफाक पटेल यांनी बकरी ईदनिमित्त होणार्‍या खर्चाची बचत करुन हा उपक्रम राबवण्यात आला असल्याचे सांगितले. समितीचे संस्थापक आसिफ महालदार, सचिव मेहबूब काझी, सल्लागार अॅड. गफूर पठाण,  गुलामनबी शेख, अॅड. सलिम पटेल, अब्दुल रज्जाक कुरेशी, फकीर आतार य‍ांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुबारक त‍ांबोळी यांनी प्रास्ताविक केले. आभार रऊफ खान यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com