
‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाइन रेल्वे प्रकल्प हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे. पुणे-नाशिक शहरांसह पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासालाही गती मिळणार आहे.
पुणे - ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाइन रेल्वे प्रकल्प हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे. पुणे-नाशिक शहरांसह पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासालाही गती मिळणार आहे. निधीची कमतरता पडू न देता हा प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करू,’’ असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडच्या वतीने ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पा’चे सादरीकरण उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत करण्यात आले. या वेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, परिवहनमंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप मोहिते-पाटील, अशोक पवार, चेतन तुपे, सदाशिव लोखंडे, डॉ. किरण लोहमटे, सरोज आहिरे उपस्थित होते.
...आता मेट्रो स्टेशनजवळील बांधकामांचा मार्ग झाला मोकळा
पवार म्हणाले, ‘‘पुणे आणि नाशिक ही दोन शहरे औद्योगिक, कृषी विकासात अव्वल आहेत. या दोन स्मार्ट सिटीला जोडण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. त्याचबरोबर या रेल्वेमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच पुणे-नाशिक प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे. अवघ्या पाऊणे दोन तासात हे अंतर कापले जाणार आहे.’’
Bird flu outbreak : पुणे जिल्ह्यात 13 कोंबड्या, दोन कावळ्यांचा मृत्यू
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
हवेलीत भूसंपादनासाठी हालचाली
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द, पेरणे, कोलवडी, हडपसर आणि बावडी या पाच गावांमधील सुमारे १५.५ हेक्टर जागेचे भूसंपादन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लवकरच भूसंपादनाची प्रकिया राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. मागील अनेक दिवसांपासून फक्त कागदावरच असलेल्या पुणे-नाशिक रेल्वेमार्गाला यामुळे गती मिळणार आहे.
लष्कराच्या आत्मनिर्भरतेसाठी आता स्वदेशीकडे वाटचाल
मुंबई-पुणे हायस्पीडचा ‘महारेल’कडून प्रस्ताव
महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीने (महारेल) राज्यासाठीचा रेल्वे प्रकल्प आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात मुंबई ते पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. हा प्रकल्प अस्तित्वात आल्यास पुण्याहून मुंबईला एक तासात पोहचता येणार आहे.
पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, मुख्य सचिव संजय कुमार आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुणेकरांच्या खिशाला किती कात्री?
भविष्यात राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल यांनी बैठकीत सादरीकरण केले. यामध्ये मुंबई-पुणे (हायस्पीड रेल्वे प्रकल्प १ तास प्रवास), रत्नागिरी-पुणे, औरंगाबाद-चाळीसगाव, रोटेगाव-कोपरगाव, पुणे-औरंगाबाद, पुणे-नांदेड, चिपळूण-कऱ्हाड (नवीन लाइन), वैभववाडी-कोल्हापूर (नवीन लाइन) या प्रकल्पांचा समावेश आहे.
Edited By - Prashant Patil