लॉकडाऊनमध्ये होतोय सोशल मीडियाचा सर्वाधिक गैरवापर; महाराष्ट्रातील 'हे' जिल्हे आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

- लॉकडाऊन काळात राज्याच्या ग्रामीण भागातुन सोशल मीडियाचा सर्वाधिक गैरवापर

- बीड, पुणे ग्रामीण, जळगावमध्ये गैरवापराचे सर्वाधिक गुन्हे

- पुण्यासह 8 शहरात केवळ 4 गुन्हे, तर अकोला-यवतमाळमध्ये अवघा 1 गुन्हा

पुणे : सायबर क्राईम म्हटले की मुंबई-पुण्यासारखी राज्यातील मोठमोठी शहरे आपल्या डोळ्यासमोर येतात.परंतु लॉकडाऊनच्या काळात मोठ्या शहरांऐवजी राज्याच्या ग्रामीण भागाने सोशल मीडियाचा गैरवापर करण्यात आघाडी घेतल्याची सद्यास्थिती आहे. लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियासंबंधी सर्वाधिक सायबर गुन्हे बीड, पुणे ग्रामीण, जळगाव येथे घडल्याचे सायबर पोलिसांकडील आकडेवारी स्पष्ट करते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बीडमधील एका तरुणाने त्याच्या फेसबुकवर फिर्यादी हा कोरोनाग्रस्त असल्याची खोटी पोस्ट टाकून त्यांची बदनामी केली, तसेच कोरोना महामारीबाबत अफवा पसरविली. तरुणाकडुन मोबाइलवर सोशल मीडियाचा वापर करताना लॉकडाऊनमध्ये कोरोना महामारीबाबत अफवा पसरविन्याचे काम केले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याच पद्धतीने ग्रामीण भागात लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियाचा गैरवापर करण्याच्या अनेक घटना घडल्या. मोठ्या शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, यूट्यूब  अशा सोशल मीडियाचा खोटी, चुकीची माहिती व अफवा पसरविन्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या. ग्रामीण भागात वेगवेगळ्य कारणामुळे तरुणाकडुन मोबाईलचा सर्वाधिक वापर करण्यात येत होता. त्यातच काही जणाकडुन सोशल मीडियाचा गैरवापर केला गेल्याची माहिती पुढे आली. शहरांमध्ये सोशल मीडियाद्वारे खोटी माहिती पसरविल्यास गुन्हा दाखल होतो, कारावासही भोगावा लागतो, याची पोलिसांकडुन मोठया प्रमाणात जागृती केली जात असल्याने नागरीक त्याबाबत जागरुक आहेत. याउलट ग्रामीण भागात जागृतीचा अभाव असल्याने तेथे जास्त गुन्हे घडत असल्याची सद्यस्थिती आहे.

- शहरांमधील बांधकाम व्यावसायिक सापडले नियमावलीच्या कात्रीत; वाचा सविस्तर बातमी

"लॉकडाऊन काळात बीड, पुणे ग्रामीण, जळगाव येथे सोशल मीडियाचा गैरवापर करण्याचे गुन्हे सर्वाधिक घडले आहेत,तर पुण्यासह 8 शहरात  4 गुन्हे आहेत. यवतमाळ, अकोला येथे केवळ 1-1 गुन्हा नोंद झाला आहे" अशी माहिती महाराष्ट्र सायबर पोलिसांनी दिली.

माळेगाव कारखान्यातील अपघाताची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल   

बीडमध्ये सर्वाधिक 38, तर पुणे ग्रामीणमध्ये 30 सायबर गुन्हे, यवतमाळ, अकोल्यात 1-1 गुन्हा
राज्यात सर्वाधिक 41 सायबर गुन्हे बीड जिल्हामध्ये घडले आहेगत. त्यापाठोपाठ पुणे ग्रामीणमध्ये 31 सायबर गुन्हे नोंद झालेले आहेत. त्यानंतर जळगाव 29, मुंबई 21, कोल्हापुर व नाशिक ग्रामीण 16, सांगली,  बुलढाणा 14, ठाणे शहर 13, जालना 12, नाशिक शहर, नांदेड, सातारा 11, पालघर, अहमदनगर, लातूर 10, नागपुर शहर, नवी मुंबई 9, परभणी, ठाणे ग्रामीण, सिंधुदुर्ग 8, अमरावती, हिंगोली 7, गोंदिया, सोलापूर ग्रामीण 5, धुळे 3 गुन्हे दाखल आहेत.

वीज ग्राहकांनो,आता घरबसल्या मांडा तक्रारी; महावितरणाने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय 

यवतमाळ व अकोल्यात अवघे 1-1 गुन्हे
एकीकडे राज्याच्या ग्रामीण भागात सायबर गुन्हे वाढत असताना यवतमाळ व अकोला येथे मात्र केवळ एक-एक गुन्हे दाखल झाले आहेत.  त्यामुळे या दोन जिल्ह्यांत सायबर गुन्हे करणाऱ्याचे प्रमाण नगण्य असल्याची सद्यस्थिती आहे.

कोथरूडकरांची काळजी वाढली; औषध व्यावसायिकाला झाली कोरोनाची लागण!

पाच जिल्ह्यात प्रत्येकी 2, तर पुण्यासह आठ जिल्ह्यात केवळ 4 सायबर गुन्हे
रायगड, वाशीम, वर्धा, नंदुरबार व उस्मानाबाद या पाच जिलह्यात अवघे 2 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापाठोपाठ पुणे शहर, रत्नागिरी, सोलापूर शहर, नागपुर ग्रामीण, भंडारा, पिंपरी - चिंचवड, अमरावती ग्रामीण, चंद्रपुर या जिल्हामध्ये केवळ 4 सायबर गुन्हे दाखल आहेत. एकुणच या 13 जिल्ह्यात पोलिस प्रशासनाकडुन सायबर गुन्हे करणाऱ्यावर चांगलेच नियंत्रण मिळविले जात असल्याचे दिसुन येत आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ग्रामीण भागात गैरप्रकार वाढण्याची कारणे
- सायबर क्राईमबाबत पुरेशी जागृती नसणे
- डिजीटल
- मोबाईल कंपन्याच्या स्पर्धेमुळे स्वस्तात इंटरनेट
- शहरातुन ग्रामीण भागामध्ये पुन्हा मोठ्या संख्येने झालेले स्थलांतर 
- शेतीची कामे व हातांना रोजगार नसणे
- वीजेचा लपंडाव व करमणुकीच्या साधनाचा अभाव

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The highest misuse of social media in rural areas of the state during the lockdown period