पुण्यात झोमॅटोची ऑर्डर मिळण्यास अडचण; कारण...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

 

कोथरूड, बाणेर आणि शिवाजीनगर भागातील सर्वाधिक रायडर संपात सहभागी झाले होते. शहरात इतर ठिकाणी देखील 'झोमॅटो'च्या सेवेवर परिमाण झाला होता. त्यामुळे अनेक खवय्यांना जेवणासाठी घर किंवा कार्यालयाजवळचे हॉटेल गाठावे लागले.

पुणे : अचानक कामावरून काढू नये, ऑर्डर पोचविण्याचे पुरेसे पैसे द्यावेत, मल्डीऑर्डर बंद करावी, वेळेची बंधने ठेवून नये, लांबचे ड्रॉप नसावेत यासह विविध मागण्यांसाठी 'झोमॅटो'च्या सुमारे तीन हजार डिलिव्हरी बॉयने (रायडर) गुरुवारी काम बंद आंदोलन केले. रायडर संपावर गेल्याने झोमॅटोची ऑर्डर पुरविण्याची यंत्रणा कोलमडली होती.

कोराई गडावर रात्री मुक्काम करणे विद्यार्थ्यांना पडले महागात; वाचा काय घडले?​

कोथरूड, बाणेर आणि शिवाजीनगर भागातील सर्वाधिक रायडर संपात सहभागी झाले होते. शहरात इतर ठिकाणी देखील 'झोमॅटो'च्या सेवेवर परिमाण झाला होता. त्यामुळे अनेक खवय्यांना जेवणासाठी घर किंवा कार्यालयाजवळचे हॉटेल गाठावे लागले.

सारथी संस्थेसाठी खासदार संभाजीराजे आक्रमक; घेतला मोठा निर्णय!

'झोमॅटो'साठी रायडर म्हणून काम करणाऱ्यांना पूर्वी चांगले पैसे मिळत होते. मात्र, कंपनीने दरपत्रक अचानक बदलले व डिलिव्हरी करण्याचे दर अचानक कमी केले. तसेच अचानक कामावरून काढणे, वेळेचे बंधने ठेवणे अशा अनेक प्रकार सुरू होते. त्यामुळे आमच्या विविध मागण्याचे निवेदन आम्ही सोमवारी कंपनी प्रशासनाकडे दिले होत. त्यावर कंपनीने निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी मागितला होता. मात्र, कंपनीकडून प्रतिसाद न आल्याने आम्ही काम बंद आंदोलन केल्याची माहिती राईडरर्सने दिली.

पुणे : अजित पवार, भरणे यांच्या मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर लाडू वाटून जल्लोष

सध्या कंपनी एका मोठ्या ऑर्डरमागे केवळ 30 रुपये देत आहे. पूर्वी ती रक्कम जास्त होती. इतर कोणत्याही कंपनीत कर्मचाऱ्यांची पगार वाढ होते. मात्र, आमच्यासारख्या अनेक रायडरला मिळणारे पैसे कमी-कमी होत चालले आहे. त्यामुळे आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे रायडर म्हणाले.

FTII मधील PIFF चे चित्रपट प्रदर्शन रद्द कारण...

दाद कुठे मागायची?
कामावरून काढले किंवा कर्मचाऱ्यांच्या काही अडचणी असतील तर, त्या कोणापुढे मांडायच्या असा प्रश्‍न आमच्यापुढे आहे. कारण कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्थापकच नियुक्त केलेला नाही. रायडरच्या पूर्ण कुटुंबाला विमा कवच द्यावे, अशी मागणी आहे. विमा क्‍लेम करण्यात देखील अनेक अडचणी येत असल्याची खंड रायडर्सने व्यक्त केली.

शिवाजीराव भोसले बँक प्रकरणी भोसले दांपत्यावर गुन्हा दाखल

प्रमुख मागण्या ः
- नोटीस न देता कामावरून कमी करू नये- डिलिव्हरीसाठी योग्य दर ठेवावे
- मल्डीऑर्डर बंद करावी
- विनाकारण वेळेचे बंधन नसावे
- लांबच्या भागात ड्रॉप देवू नये 

पुणे मुंबई मार्गाने प्रवास करताय? जाणून घ्या महत्वाचे वाहतूक बदल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zomatos 3000 delivery boy goes on strike in Pune