पोलिस अधिकारी सरकार पाडणार होते असं मी म्हणालो नाही; गृहमंत्री देशमुख यांचे स्पष्टीकरण

Home Minister Anil Deshmukh gives explanation on Police Officers Transfers issue
Home Minister Anil Deshmukh gives explanation on Police Officers Transfers issue

पुणे : ''काही पोलिस अधिकारी सरकार पाडणार होते, असे मी म्हणालो नाही. ते वक्तव्य खोटे आहे, माझ्या तोंडी घालण्यात आले. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोठी चूक केली होती, त्यांना शिक्षाही झाली, त्यांचे समर्थन करणार नाही. पण त्यांना काही तरी जबाबदारी द्यायची म्हणून पुण्यात आणले. गुप्ताच्या चुकीचे समर्थन नाही, मोठी चुक घडली. त्यांनी मान्य केली. पण ते चांगले अधिकारी आहेत. इतक्या वर्षाचा रेकॉर्ड बघितला तर तो चांगला आहे. अधिकारी बदल्या हा रुटीनचा भाग आहे. पोलिस आयुक्त नागपुर मार्गे येवो किंवा मुंबई शेवटी मार्ग महाराष्ट्रतूनच जाणार आहे, असे सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस अधिकारी बदल्याबाबत "लोकमत" मधील बातमी चुकीची व खोटी आहे. संबंधीत वृत्तामध्ये चुकीचे विधान माझ्या तोंडी टाकले, तसे काही घडले नाही. तो व्हिडिओ क्लिप जरुर पहावे. ''असे स्पष्टीकरण दिले.  

पुणेकरांची काळजी वाढवणारी बातमी; पुढील १२ दिवसांत वाढणार ७९ हजार कोरोना रुग्ण!​

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला. अमिताभ गुप्ता यांनी उद्योगपती वाधवान यांच्यासह 22 जणांना महाबळेश्वरला जायला परवानगी पत्र दिलं होतं. ती मोठी चूक त्यांच्याकडून घडली आणि त्यांनी मान्यही केली. आता राज्यभर झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत गुप्ता यांची पुण्यात करण्यात आली. पुणे पोलिस आयुक्त पदी नियुक्ती झाल्यानंतर अमिताभ गुप्ता यांनी रविवारी पोलिस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली. डॉ.के.वेंकटेशम यांच्याकडुन गुप्ता यांनी आयुक्तपदाची सुत्रे स्विकारली.

बहिःस्थ अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी पर्याय निवडीसाठी सोमवार पर्यंत मुदत

दरम्यान, लोकमतने ''काही पोलिस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रतील उद्धव ठाकरे यांचे सरकार हाणुन पाडण्याचा प्रयत्न केला असे वक्तव्य गृहमंत्र्यांनी केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. दरम्यान, याबाबत खुलास करत वक्तव्य खोटे असल्याचा दावा करत व्हिडिओ पाहण्याचे आवाहन केले आहे.

कोरोना काळातीलपोलिसांच्या कामगिरीबाबत बोलताना ते म्हणाले, ''208 पोलीस मृत्युमुखी पडले, पोलिस हिंमत हरले नाहीत, पोलिस उपचार प्रत्येक जिल्ह्यात, मृत्युमुखी पडलेल्यांना 65 लाखांची मदत केली. मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना शासकीय निवासस्थान अखेरपर्यंत दिले. 55 वर्षांवरील पोलिस घरीच थांबले, 12 हजार 500 पोलिस भरती प्रक्रिया सुरू आहे, आर्थिक पाठबळ दिले आहे.''

मावळते पोलिस आयुक्त डॉ. वेंकटेशम यांनी पोलिसांबद्दल भावना केल्या व्यक्त, म्हणाले...​

भरतीमध्ये मराठा आरक्षनाचा प्रश्न  येणार नाही,  13 टक्के जागा बाजूला ठेवून भरती करू, कायदेशीर सल्ला घेऊन भरती करू. तसेच, ''मराठा समाजासाठी 13 टक्के कागा राखीव ठेवुनच पोलिस भरती होईल. मराठा समाजावर अन्याय होणार नाही, कायदेशीर सल्ला घेतला जाईल." असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
 

(Edited by : Sharayu Kakade)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com