बारामतीत मिळणार तीन खोल्यांची पक्की घरे, वाचा सविस्तर

मिलिंद संगई
Sunday, 20 December 2020

प्रकल्पाचे वैशिष्टय म्हणजे या पुढील काळात कोणालाही विस्थापीत न करता काम होणार आहे. या मध्ये केंद्राचे दीड तर राज्याचे एक लाख असे अडीच लाखांचे अनुदान मिळणार असून उर्वरित हिस्सा लाभार्थ्यांना भरावा लागेल.

बारामती : शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या दिशेने नगरपालिकेने आता पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे. बारामतीत आठ ठिकाणी 2570 कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 366 स्क्वेअर फूटांची तीन खोल्यांची पक्की घरे मिळणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या संदर्भात मुंबईत नुकतीच उच्चस्तरीयबैठकही पार पडली. 

बायकोवर बलात्कार आणि 20 लाखाची खंडणी; काय आहे प्रकरण

या प्रकल्पाचे वैशिष्टय म्हणजे या पुढील काळात कोणालाही विस्थापीत न करता काम होणार आहे. या मध्ये केंद्राचे दीड तर राज्याचे एक लाख असे अडीच लाखांचे अनुदान मिळणार असून उर्वरित हिस्सा लाभार्थ्यांना भरावा लागेल. ज्यांची नोंदणी बांधकाम कर्मचारी म्हणून कामगार कल्याण मंडळाकडे झाले असेल त्यांना अतिरिक्त दोन लाखांचे अनुदान मिळणार आहे. हॉल, किचन व बेडरुम अशा स्वरुपाचे 366 स्क्वेअर फूटांचे हे घर असेल. महाहौसिंगच्या माध्यमातून ही घरे उभारली जातील. 

दरम्यान विविध कामांसाठी नागरिकांचे स्थलांतर करावे लागते, त्या साठी बारामतीत प्रि फॅब्रिकेटेड 150 घरांची स्थलांतराची वसाहत निर्माण करण्याचाही प्रयत्न असून त्या दृष्टीने जागेचा शोध सध्या सुरु आहे. 

विद्यार्थी-पालकांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षा फी वाढीला पुणे विद्यापीठाने लावला ब्रेक​

बारामतीत येथे होणार घरबांधणी
•    वडकेनगर
•    डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत
•    तांदुळवाडी
•    प्रतिभानगर
•    सुहासनगर
•    साठेनगर व पंचशीलनगर
•    उघडा मारुती मंदीर सर्व्हे क्रमांक 220
•    बसस्थानकासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमलगतचा भाग

पहिला टप्प्यात येथे घरे उभारली जाणार
•    डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत- 96 घरे.
•    सर्व्हे क्रमांक 220- 125 घरे.
•    तांदुळवाडी- 110 घरे.

 धुमशान ग्रामपंचायतीचं : निवडणुका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करा : आमदार बेनके​

लाभार्थ्यांना लवकर घरे देण्याचा प्रयत्न-
नगरपालिकेच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत लाभार्थ्यांना वेळेत घरे देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीतील लाभार्थ्यांचे संपूर्ण पुर्नवसन नगरपालिकेने करण्याचा शब्द त्यांना देण्यात आला आहे, त्या नुसार त्या लाभार्थ्यांना त्यांचा हिस्सा भरावा लागणार नाही.-किरणराज यादव, मुख्याधिकारी, बारामती नगरपालिका. 

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: housing project in baramati will start soon