१ जुलैपासून एचएसआरपी बंधनकारक; नियम मोडल्यास १ हजार रुपयांचा दंड

१ जुलैपासून एचएसआरपी बंधनकारक; नियम मोडल्यास १ हजार रुपयांचा दंड
Published on

एक जुलैपासून एचएसआरपी बधनकारक
नियम मोडल्यास दंड; जुन्या वाहनांसाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : राज्यातील एक एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) बसविण्याची अंतिम मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. या मुदतीनंतर म्हणजेच १ जुलै २०२६ पासून एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर विशेष तपासणी मोहीम राबवून कारवाई करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून एक हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी आणि वाहनांची ओळख अधिक सुरक्षित व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने शासनाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी वाहनधारकांना एचएसआरपी बसविण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, राज्यातील कामाचा वेग आणि वाहनधारकांची गैरसोय लक्षात घेऊन शासनाने ही मुदत आणखी सहा महिन्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनचोरी, बनावट नंबर प्लेटचा वापर आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी एचएसआरपी प्रणाली महत्त्वाची ठरणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जुन्या वाहनांनाही ही नंबरप्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com