esakal | शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी कामगार दिनी होणार आगळेवेगळे उपोषण; जाणून घ्या!
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer-Worker

सरकारला त्यांच्या संविधानिक जबाबदारीचे भान करून देण्यासाठी जागृत नागरिकांनी उचललेले हे सजग पाऊल आहे.

शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी कामगार दिनी होणार आगळेवेगळे उपोषण; जाणून घ्या!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशात शेतकरी आणि कष्टकर्‍यांची काय अवस्था आहे हे कोरोना आणि त्याच्या सुरुवातीपासून झालेली कष्टकर्‍याची वाताहत यामुळे उघड झाले आहे. म्हणून शेतकरी आणि कष्टकर्‍यांच्या या अवस्थेविषयी सहवेदना प्रकट करण्यासाठी कामगार दिनी (ता.१) राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर लाक्षणिक उपोषण करणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यातील कामगार नेते आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या पाठींब्याने हे उपोषण आयोजित करण्यात आले असून ते सर्व यात सहभागी होणार आहे, अशी माहिती कामगार नेते नितीन पवार यांनी दिली. उपासमारीवर मात करण्यासाठी गरज असलेल्या सर्वांना रेशन कार्ड नसले तरी मोफत धान्य मिळाले पाहिजे. राज्यांतर्गत स्थलांतरित मजूरांना त्यांच्या गावी परत नेण्याची व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावी.

- Coronavirus : पुण्याच्या महापौरांचे पत्र व्हायरल; रोहित पवारांनी केला खुलासा

लाॅकडाऊनमधे ज्या मजूरांना त्यांचे थकीत वेतन आणि देय वेतन मिळण्यासाठी तालुका आणि जिल्हा स्तरावर यंत्रणा कार्यरत करण्यात यावी. अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना दुप्पट पगार द्यावे आणि पन्नास लाखांच्या विम्याचे संरक्षण देण्यात यावे. या काळात घसरलेल्या आर्थिक वाढीच्या दराचा बोजा कामगार वर्गाच्या माथी मारून कामगार विरोधी धोरणे आणि कायदे करण्यात येऊ नयेत.

- 'इथं शहर कोरोनाविरुद्ध लढतंय अन् तुम्ही शहर सुशोभिकरणाची टेंडर काढताय' : खा. चव्हाण

लाॅकडाऊन संपवण्याची रणनीती विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींसोबत चर्चा करून ठरवण्यात यावी, या मागण्यांसाठी उपोषण करण्यात येत आहे. सरकारला त्यांच्या संविधानिक जबाबदारीचे भान करून देण्यासाठी जागृत नागरिकांनी उचललेले हे सजग पाऊल आहे. सुर्योदय ते सूर्यास्त होणारा हा उपवास कृतज्ञतेचा, सहवेदनेचा, संविधानिक जबाबदारीचा आहे. 

- Big Breaking : विद्यापीठाच्या परीक्षांची तारीख ठरली; 'यूजीसीने नवी नियमावली केली जाहीर!

आम्ही उपोषण करणार आहोत तुम्हीही करा, असे आवाहन डॉ. बाबा आढाव, नितिन पवार, गीताली वि. म., मुकुंद कीर्दत, डॉ. अभिजीत वैद्य, मुक्ता व डॉ. हमीद दाभोलकर, खासदार हुसेन दलवाई, धनाजी गुरव, डॉ. स्मिता शहापूरकर, डॉ. सुगण बरंठ, चंदन कुमार, सुभाष लोमटे, मुक्ता श्रीवास्तव, उल्का महाजन, डॉ. रूपा कुलकर्णी-संबोधी यांनी केले आहे. कर्नाटक आणि गुजरात येथेही काही ठिकाणी उपोषण होणार आहे.

loading image