मुलांनी सांभाळ न करणाऱ्या आई-वडिलांसाठी मोठी बातमी; मिळणार आधार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

  • कौटुंबिक न्यायालयात धाव घेतल्यानंतर मुलगा देणार पैसे

पुणे : सोबत राहू शकत नसेल, तरी चालेल. मात्र, आम्हांला घर खर्चासाठी पुरेसे पैसे तरी दे,'' अशी मुलाकडे याचना करणाऱ्या आई-वडिलांना अखेर काहीसा आधार मिळाला. दोघांच्याही दैनंदिन गरजा भागाव्यात म्हणून मुलगा दरमहा आठ हजार रुपये देण्यास तयार झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

32 वर्षीय मुलगा पैसे देत नाही म्हणून 60 वर्षीय वडील आणि 55 वर्षांच्या आईने 2019 मध्ये कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर झालेल्या चर्चेनंतर मुलाने अर्ज केल्यापासून फेब्रुवारी 2020 पर्यंतचे दरमहा आठ हजार रुपये आई-वडिलांना दिले.

Delhi Election : तिवारी म्हणाले होते 'ट्विट जपून ठेवा'; निकालनंतर होतायेत ट्रोल

याबाबत सविस्तर माहिती अशी, की पत्नीला नागपूरला नोकरी लागली म्हणून सुरेश (नाव बदललेले) हे आई-वडिलांना पुण्यात सोडून तिकडेच स्थायिक झाले. तब्येत चांगली होती, तोपर्यंत दोघांनीही मुलाकडून काही अपेक्षा ठेवल्या नाहीत. मात्र, वडील निवृत्त झाल्यानंतर आर्थिक चणचण भासू लागली. त्यामुळे त्यांनी सुरेश यांच्याकडे दरमहा काही ठरावीक रक्कम देण्याची मागणी केली. परंतु, तुमच्याकडे घर आणि दोन खोल्या आहेत.

Delhi Election : 'आय लव्ह यू' म्हणत विजयानंतर केजरीवालांनी दिली 'ही' प्रतिक्रीया

त्या भाड्याने देऊन आलेल्या पैशातून स्वतःचा खर्च भागवा, असे सुरेश यांनी सुनावले. त्यावर आई-वडिलांनी भूमिका घेतली, की आम्ही तुला लहानाचा मोठा केला. आत्तापर्यंत तुझ्याकडून काही अपेक्षा ठेवल्या नाहीत. त्यामुळे आम्हांला सांभाळणे ही तुझी जबाबदारी आहे. तसेच सुरेश यांचे कौटुंबिक न्यायालयात समुपदेशनदेखील करण्यात आले. त्यानंतर ते दोघांनाही मिळून दरमहा आठ हजार रुपये देण्यास तयार झाले.

खूशखबर ! या कंपनीत आहे २० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती
 

...तर पैसे मागितले नसते
सुरेश यांच्या आईवडिलांनी अत्यंत कष्टातून संसार उभा केला आहे. मजुरीच्या कामातून त्यांनी सुरेश यांना शिक्षण दिले. मात्र, वय झाल्याने ते आजारी पडू लागले. तर निवृत्त झाल्याने पैसेदेखील पुरत नव्हते. ""माझे शरीर चांगले असते, तर तुझ्याकडे पैसे मागितले नसते,'' असे सुरेशच्या वडिलांनी सांगितले. न्यायालयासदेखील त्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If the parents come in court then Son will have to pay money