esakal | निर्बंधातही जुळले रेशीम बंध ! एप्रिलमध्ये तब्बल ५०० जोडप्यांनी उरकले शुभमंगल

बोलून बातमी शोधा

marriage

निर्बंधातही जुळले रेशीम बंध ! एप्रिलमध्ये तब्बल ५०० जोडप्यांनी उरकले शुभमंगल

sakal_logo
By
अनिल सावळे -@AnilSawale

पुणे : कोरोनामुळे 'ब्रेक द चेन' च्या कालावधीत जिल्हाबंदीचा परिणाम नोंदणीकृत विवाह समारंभावर झाला असला तरी एप्रिलमध्ये सुमारे पाचशे जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने शुभमंगल उरकले आहे. गतवर्षीच्या लॉकडाउनमध्ये एप्रिलमध्ये एकही नोंदणी

विवाह झाला नव्हता. गतवर्षी जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत ५ हजार २२२ जोडप्यांचे नोंदणी विवाह पार पडले. गतवर्षीच्या जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या तुलनेत यावर्षी नोंदणी विवाहाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर्षी जानेवारी ते डिसेंबर या चार महिन्यात अडीच हजारांहून अधिक जोडपी विवाह नोंदणी करून लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले.

हेही वाचा: प्लास्टिक पिशवीत अडकून बिबट्याचा मृत्यू

हे लक्षात ठेवा

  • नियोजित वधू-वरांना विवाह नोंदणी कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह लेखी अर्ज द्यावा लागतो

  • विवाह नोंदणी कार्यालयाकडून एक महिन्याची नोटीस

  • नियोजित वधू-वरांना पुढील दोन महिन्यांत विवाह नोंदणी कार्यालयात येऊन नोंदणी विवाह करता येतो

  • विवाह नोंदणी अधिकारी गृहभेट किंवा मंगल कार्यालयात येऊनही विवाह नोंदणी करतात

  • त्यासाठी शुल्क आकारण्यात येते

लग्नाला दहाच वऱ्हाडी

विवाह नोंदणी करताना वधू-वरासोबत तीन साक्षीदार विवाह नोंदणी अधिकारी आणि कर्मचारी यांची आवश्यकता असते. यासोबतच वधू-वराचे नातेवाईक असल्यास सुमारे दहा-बारा वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत हा नोंदणी विवाह होत असल्याची माहिती विवाह नोंदणी कार्यालयाकडून देण्यात आली.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवड शहरात ९८ लसीकरण केंद्रे बंद

पंधरा ते वीस मिनिटांत लग्न

नियोजित वधू-वर हे कार्यालयात आल्यानंतर आवश्यक कागदपत्रे असल्यास विवाह नोंदणीची प्रक्रिया केवळ १५ ते २० मिनिटांत पूर्ण होते. तसेच, विवाह नोंदणीचे प्रमाणपत्रही नवदांपत्याला दिले जाते.

एकाच दिवशी ११९ विवाह

कोरोनाच्या कालावधीत मागील २७ नोव्हेंबरला तुलसी विवाहानंतर एकाच दिवशी ११९ जोडपी विवाहाच्या बंधनात अडकले. विवाह नोंदणी कार्यालयातील गेल्या काही वर्षांतील एकाच दिवशी झालेली ही सर्वाधिक विवाह नोंदणी आहे.

हेही वाचा: सौ रुपये नहीं मिलते, कैसे जियेंगे

जिल्हा बंदीमुळे जिल्ह्याबाहेरील वधू किंवा वर यांना पुण्यात येणे शक्य होत नाही. अन्यथा यापेक्षाही विवाह नोंदणीच्या प्रमाणात वाढ झाली असती. तथापि गतवर्षीच्या तुलनेत विवाह नोंदणीचे प्रमाण अधिक आहे. मे महिन्यात विवाह समारंभासाठी १४ शुभ मुहूर्त आहेत. त्यामुळे विवाह नोंदणीची संख्या वाढेल.

- डी. ए. सातभाई, विवाह नोंदणी अधिकारी, पुणे जिल्हा