आंबेगावातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ...पेठमध्ये घेतला हा निर्णय

corona
corona

मंचर / सातगाव पठार (पुणे) : आंबेगाव तालुक्यात १२ गावांत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांमध्ये शनिवारी (ता. 29) दोनने भर पडली आहे. एकूण पाँझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तब्बल २७ झाली आहे. अजून ३३ जणांचे नमुने घेतले असून, त्यांचे अहवाल पुण्याच्या प्रयोगशाळेत प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे प्रशासनातील  अधिकारी व तालुक्यातील १०४ गावांतील गावकरी काळजीत पडले आहेत. पेठ येथे 12 जूनपर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. 

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येण्यासाठी आरोग्य विभाग, तालुका पंचायत समिती, ग्रामपंचायती व पोलिस खात्यातील अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस धावपळ करत आहेत. गावोगावच्या नागरिकांना धीर दिला जात असून, विनाकारण फिरणाऱ्याना कायद्याचा इंगा पोलिस यंत्रणेकडून दाखविला जात आहे. त्यामुळे रिकामटेकड्याच्या फिरण्यावर बंधने आली असून, आता त्यांनी घरात थांबणे पसंत केले आहे.

गिरवली व गांजवेवस्तीमध्ये प्रत्येकी रुग्णांची संख्या दोन झाली आहे. घोडेगाव, साकोरे, शिनोली, निरगुडसर, जवळे, गांजवेवस्ती (वळती), वडगाव काशिंबेग, पिंगळवाडी (लांडेवाडी) फदालेवाडी, गिरवली हि गावे लोकसंख्येने मोठी आहेत. पेठ, एकलहरे हि गावे पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत आहेत. घोडेगाव बाजारपेठेतील व्यवहार पूर्णपणे बंद असून, १५ शासकीय कार्यालयातील कामकाजावरही मोठा परिणाम झाला आहे. अधिकारीही काळजीत पडले आहेत. 

या गावांमध्ये १२८ कोरोना सर्वेक्षण पथके कार्यरत केली असून, १७५ कर्मचारी सर्वेक्षण करतात. जीवनावश्यक वस्तू घरपोच दिल्या जातात. गावच्या सुरक्षा समित्यांमार्फत जनजागृतीची कामे गावात सुरु झाली आहेत. फवारणी करून गावांचे निर्जंतुकीकरण, इम्फ्रा थर्मामीटरद्वारे तापमान मोजणी केली जात आहे. मुंबईकरांमुळे संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे मुंबईकरांना, आता कृपा करून गावाला येऊ नका, असे गावकरी मोबाईलद्वारे संपर्क साधून विनंती करत आहेत.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा  
पेठ गावात 14 दिवस बंद                         सातगाव पठार : आंबेगाव तालुक्‍यातील पेठ येथे दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने 12 जूनपर्यंत गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. गावातील सर्वबाजूच्या सीमा बंद करून मेडिकल व दवाखाने वगळता बॅंका, पतसंस्था, बाजारपेठ, व सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. पेठ गाव हे आंबेगाव तालुक्‍याचे पुणे बाजूने प्रवेशद्वार आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पेठ गाव पुढील 14 दिवस कडक बंद पाळणार आहे. ज्या कुटुंबात कोरोना पॉझिटिव्ह आहेत, त्या कुटुंबातील इतरांना ग्रामपंचायत घरपोच गरजेच्या वस्तू, भाजीपाला, गॅस पुरवणार आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. बॅंका व पतसंस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तीवर कलम 188 अन्वये तत्काळ गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे ग्रामपंचायतीने जाहीर नोटिशीद्वारे स्पष्ट केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com