
देशात यंदा तांदळाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत २०२०-२१ या वर्षात तांदळाचे साधारणतः बारा कोटी टनांपर्यंत उत्पादन झाले आहे. त्यामुळे तांदळाच्या उत्पादनात जगात भारत हा दुसऱ्या क्रमांकावर पोचला आहे. जगभरात भारताने १४५ लाख टनांपर्यंत तांदळाची निर्यात केली आहे. यामुळे जगात सर्वांत जास्त निर्यातदार देश बनला आहे.
मार्केट यार्ड - देशात यंदा तांदळाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत २०२०-२१ या वर्षात तांदळाचे साधारणतः बारा कोटी टनांपर्यंत उत्पादन झाले आहे. त्यामुळे तांदळाच्या उत्पादनात जगात भारत हा दुसऱ्या क्रमांकावर पोचला आहे. जगभरात भारताने १४५ लाख टनांपर्यंत तांदळाची निर्यात केली आहे. यामुळे जगात सर्वांत जास्त निर्यातदार देश बनला आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
देशात २०२०-२१ या वर्षी तांदळाचे उत्पादन १२ कोटी टनापर्यंत झाले आहे. आत्तापर्यंतच्या उत्पादनाच्या तुलनेत ते विक्रमी ठरले आहे. २०१८-१९ मध्ये ११.६४ कोटी टन, २०१९-२० मध्ये ११.८४ कोटी टन उत्पादन झाले होते. या वर्षी पाऊस, पाणी व हवामान चांगले असल्याने देशात विक्रमी उत्पादन आले आहे. जगात अन्य देशांच्या तुलनेत उत्पादनात भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. संपूर्ण जगात तांदळाचे उत्पादन २०२०-२१ मध्ये ५०.३१ कोटी टन आहे, असे व्यापारी राजेश शहा यांनी सांगितले.
Petrol Price: पुण्यात पेट्रोलच्या शतकाला अवघ्या काही 'धावा' उरल्या
असे आहे उत्पादन
दारुसाठी पैसे मागितले म्हणून केला खून; तरुण बेपत्ता होण्यामागचं गूढ उकललं
या वर्षी देशात २.८१ कोटी टन तांदूळ साठा शिल्लक राहत आहे. २०२०-२१ मध्ये भारताकडून जगात साधारण १४० लाख टन ते १४५ लाख टन निर्यात होणे अपेक्षित आहे. त्यामुळे जगात निर्यातीत भारत पहिल्या क्रमांकावर असेल. संपूर्ण जगाला देशातून बासमती व नॉन बासमती तांदूळ मोठ्या प्रमाणावर निर्यात होतो. कोरोनाची परिस्थिती असूनही मोठ्या प्रमाणावर देशाकडून निर्यात झाली आहे. अनेक देशांनी तांदूळ आयात केला आहे. युरोपियन देशांनी जगात सर्वांत जास्त २५ लाख टन तांदूळ आयात केला.
- राजेश शहा, व्यापारी
Edited By - Prashant Patil