Coronavirus : कोरोना व्हायरसचा फोटो समोर; कसा आहे कोरोना पाहाच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian scientists succeed in capturing Corona's image

पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थतील (एनआयव्ही) संशोधकांनी प्रयोगशाळेत हि प्रतिमा विकसित केली आहे. प्रयोगशाळेत ३० जानेवारीला पहिल्या भारतीय रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाची चाचणी करण्यात आली होती. निरीक्षणासाठी संरक्षित केलेल्या याच 'स्वाब' मधील कोरोना विषाणूची ही प्रतिमा आहे. कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपचारासाठी त्याच्या रचनेची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी टीइएम या सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने भारतीय शास्त्रज्ञांनी हि प्रतिमा मिळवली.

Coronavirus : कोरोना व्हायरसचा फोटो समोर; कसा आहे कोरोना पाहाच!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : नॉव्हेल कोरोना विषाणूची (कोविड-१९) प्रतिमा मिळवण्यास भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये 'ट्रांसमिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप'च्या (टीइएम) साहाय्याने घेण्यात आलेली ही प्रतिमा प्रकाशित करण्यात आली आहे. फेब्रुवारी मध्ये अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी कोरोनाची जगातील पहिली प्रतिमा मिळवली होती.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थतील (एनआयव्ही) संशोधकांनी प्रयोगशाळेत हि प्रतिमा विकसित केली आहे. प्रयोगशाळेत ३० जानेवारीला पहिल्या भारतीय रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाची चाचणी करण्यात आली होती. निरीक्षणासाठी संरक्षित केलेल्या याच 'स्वाब' मधील कोरोना विषाणूची ही प्रतिमा आहे. कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपचारासाठी त्याच्या रचनेची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी टीइएम या सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने भारतीय शास्त्रज्ञांनी हि प्रतिमा मिळवली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

असा आहे कोरोनाचा विषाणू :
- गोलाकार भागाचा व्यास : ७० ते ८० नॅनोमीटर
- 'डंबेल्स'सारखा बाहेर निघालेला भाग : १३ ते १७ नॅनोमीटर
- सरासरी आकारमान : ७५ नॅनोमीटर

- शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी; पीककर्ज परतफेडीला मुदतवाढ!

अशी मिळवली प्रतिमा
- घशातील द्रवापदार्थाचा ०.५ मिली नमुना चाचणीसाठी घेण्यात आला.
- न्यूक्लिक ऍसिडच्या साहाय्याने विशिष्ट पॉलिमरसोबत रासायनिक अभिक्रिया करण्यात आली
- अपकेंद्रिय (सेंट्रीफ्युगल) गोलाकार गतीने अनावश्यक घटक हटविण्यात आले.
- कार्बनचे वेष्टन असलेल्या तांब्याच्या सूक्ष्म जाळीवर नमुना ठेवण्यात आला
- १०० किलोवॅट इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीच्या साहाय्याने प्रतिमा मिळविण्यात आली. 

- विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; 'नीट' परीक्षेस स्थगिती!

कोरोनाची हि प्रतिमा महत्वाची का?
- प्रतिबंधात्मक औषध निर्मितीची हा पहिला टप्पा आहे
- प्रतिमेच्या साहाय्याने कोरोना विषाणूंच्या(सार्स कोविड-२ ) वैशिष्ट्यांची माहिती मिळते
- मानवी पेशीवर विशेष करून भारतीय उपखंडातील व्यक्तीच्या पेशींवर तो कशा प्रकारे अभिक्रिया करतो हे स्पष्ट होते.
- जैवभौतिकशास्रच्या साहाय्याने अधिक संशोधन करता येते.

Corona Virus : लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कर्नाटक राज्यातील 450 कामगारांना दिलासा

loading image
go to top