

Indigo Cancels 42 Flights in Pune Ticket Prices Touch One Lakh
Esakal
पुण्यात ४२ विमान उड्डाणं रद्द, तिकीटाच्या किंमती लाखाच्या घरात; प्रवाशांना विमानतळावर रात्र काढण्यडीजीसीएने बदललेल्या नियमानंतर इंडिगोचं वेळापत्रक कोलमडलं असून यामुळे हजारो विमान उड्डाणं रद्द करण्याची वेळ आलीय. विमानतळांवर प्रवाशांना ताटकळत बसावं लागत आहे. विमान उड्डाणात कामाच्या वेळेची मर्यादा घातल्यानं वैमानिक उपलब्ध नसल्यानं इंडिगो एअरलाइन्सची सेवा जवळपास ठप्प झाली आहे. पुण्यात आजही ४२ विमानांचं उड्डाण रद्द केलंय. यामुळे उड्डाणाचं तिकीट दर एक लाखांवर पोहोचलेत. इंडिगोच्या वेळापत्रक विस्कळीत झाल्याचा सर्वाधिक फटका पुणे विमानतळाला बसला आहे.