INDvsSL : सॅमसनचे पुनरागमन; टॉस जिंकून श्रीलंकेचा गोलंदाजीचा निर्णय!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

श्रीलंकेने माजी कर्णधार एंजेलो ला संघात स्थान दिले आहे. भारत आणि श्रीलंकेचा हा पुण्यातील गहुंजे स्टेडियम वरील दुसरा टी-२० सामना आहे.

INDvsSL : पुणे : भारत आणि श्रीलंका यांच्यातील अखेरच्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मलिंगाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात अखेर संजू सॅमसनला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय संघात अखेरच्या सामन्यासाठी तीन बदल करण्यात आले आहेत. कुलदीप यादवच्या जागी संघात युझवेंद्र चहल, रिषभ पंतच्या जागी संजू सॅमसन आणि शिवम दुबेच्या जागी मनीष पांडेला संघात जागा देण्यात आली आहे. 

- Video : मराठमोळ्या स्मृतीने घेतलेला अफलातून कॅच होताेय व्हायरल

श्रीलंकेने माजी कर्णधार एंजेलोला संघात स्थान दिले आहे. भारत आणि श्रीलंकेचा हा पुण्यातील गहुंजे स्टेडियम वरील दुसरा टी-२० सामना आहे. याधीच्या सामन्यात २०१६ मध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर मात्र भारताने श्रीलंकेवर ९ वेळा विजय मिळवला आहे.

- 'धोनीची जागा मी कधीच घेऊ शकत नाही!'

भारत : केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, मनिष पांडे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, जसप्रित बुमरा, नवदीप सैनी. 

- धोनी लवकरच वनडेमधून निवृत्त होऊ शकतो : शास्त्री

श्रीलंका : धनुष्का गुनतिलका, अविष्का फर्नांडो, कुशल परेरा (यष्टीरक्षक), ओशादा फर्नांडो, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डिसिल्व्हा, दसून शनका, लक्षण संदकान, विनांन्दू हसरंगा, लसिथ मलिंगा (कर्णधार), लाहिरू कुमारा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: INDvsSL India to bat first and Sanju Samson gets in game