अन् शेतकऱ्याने जिंकली न्यायाची लढाई; वाचा काय घडले?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

नेताजी महादेव बंडगर (वय 37, रा. मिरज, जि. सांगली) असे त्या शेतकऱ्याचे नाव. बंडगर यांनी 2 जानेवारीला बैलगाडा भाड्याने दिला होता. त्यावेळी तिघांना त्या बैलगाडीतून रेल्वेची संपत्ती चोरताना अटक करण्यात आली. त्यावेळी रेल्वे पोलिसांनी बैलगाडा आणि बैल जप्त केला होता. मात्र, त्यावर बंडगर यांची उपजीविका सुरू होती.

पुणे : रेल्वेची संपत्ती चोरून त्यांची वाहतूक केली म्हणून जप्त केलेला बैल आणि बैलगाडा शेतकऱ्याने न्यायालयीन लढा लढवून परत मिळविला. येथील रेल्वेचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एम. राऊत यांनी याबाबतचा आदेश दिला. 

तीन दिवसांपुर्वीच 'ती' शिक्षिका म्हणून रुजु झाली अन् आज...
 

नेताजी महादेव बंडगर (वय 37, रा. मिरज, जि. सांगली) असे त्या शेतकऱ्याचे नाव. बंडगर यांनी 2 जानेवारीला बैलगाडा भाड्याने दिला होता. त्यावेळी तिघांना त्या बैलगाडीतून रेल्वेची संपत्ती चोरताना अटक करण्यात आली. त्यावेळी रेल्वे पोलिसांनी बैलगाडा आणि बैल जप्त केला होता. मात्र, त्यावर बंडगर यांची उपजीविका सुरू होती. त्यामुळे बैल, बैलगाडा परत मिळावा यासाठी बंडगर याने अॅड. श्रीकृष्ण घुगे, अॅड. शीतल आवळे आणि ऍड. प्रियांका शितोळे यांच्यामार्फत येथील न्यायालयात धाव घेतली.

यात्रेला निघालेल्या बाप-लेकीवर काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू 

जप्त केलेल्या बैलाला चांगल्या परिस्थितीत ठेवायची सोय रेल्वे प्रशासनाकडे नाही. बैलाचा मूळ मालक बंडगर हे आरोपी नाहीत. भाड्याने देताना चोरीच्या कामासाठी बैलगाडा वापरण्यात येणार असल्याची माहिती त्यांना नव्हती. त्यांची त्या बैलगाडीवर उपजीविका आहे. दैनंदिन उत्पन्न त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे जप्त केलेला बैल आणि बैलगाडा सोडण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली. 

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांवर शिक्कामोर्तब; यांची निवड 

दोन्ही पक्षांचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने बैल, बैलगाडा सोडण्याचा आदेश दिला. याविषयी श्रीकृष्ण घुगे म्हणाले, ''बैल ही वस्तू नाही. प्राणी आहे. त्यामुळे ती जप्त करणे योग्य नाही. बैलाचे संगोपन करावे लागते. त्याला वेळच्यावेळी चारा-पाणी द्यावे लागते. अन्यथा त्याच्या जिवास धोका निर्माण होण्याची शक्‍यता असते. शेतकऱ्याला जप्ती झालेला बैल, बैलगाडा मिळविण्यासाठी मिरज येथून पुणे येथे येऊन संघर्ष करावा लागला.'' 

संभाजीराजेंचे उपोषण मागे; सारथीची स्वायत्तता कायम राहणार (व्हिडिओ)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Innocent farmer got back his bull and bullock cart seized by Railway security in Pune