esakal | Coronavirus : 'तबलीगी-ए-जमात' प्रकरणी जुन्नरमधील अन्य धर्मीय युवकाची चौकशी
sakal

बोलून बातमी शोधा

Tablighi-Jamaat

शासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीत खोडद येथील एका युवकाचे देखील नाव असल्याची माहिती पुढे आली आहे.

Coronavirus : 'तबलीगी-ए-जमात' प्रकरणी जुन्नरमधील अन्य धर्मीय युवकाची चौकशी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : निजामुद्दीनमधील तबलीगी-ए-जमातीच्या मेळाव्याबाबत जुन्नर येथील अन्य धर्मीय युवकाची पोलिसांनी कसून चौकशी केली. तसेच त्याला कोरोनाच्या टेस्टला सामोरे जावे लागल्याची घटना समोर आली आहे. पुणे विभागातील १८२ जणांची यादीत या युवकाचे नाव आढळून आले आहे. मात्र, 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याबाबत संबंधित युवकाने दिलेल्या माहितीनुसार, 'तो वापरात असलेले सिम कार्ड एक वर्षापूर्वी हरविले मात्र त्याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली नव्हती. यामुळे शासकीय यादीद्वारे दिल्ली येथील निजामुद्दीन मरकत प्रकरणाशी संबधीत युवकाचा थेट संबंध जोडण्यात आला. तपासणीनंतर या युवकाला घरी सोडण्यात आले. परंतु निजामुद्दीन मरकत प्रकरणाशी संबंध नसताना सिमकार्ड हरविल्याची तक्रार न केल्याने या युवकाची परवड झाली.  

आणखी वाचा - अमेरिकेसाठी 9/11पेक्षा कोरोना घातक

१ एप्रिलला शासनाने दिल्ली निजामुद्दीन मरकत संदर्भातील संशयितांची यादी प्रसिद्ध केली होती. या यादीत तुझा मोबाईल नंबर असल्याने तुझा संबंध काय? अशी चौकशी पोलीस व महसुल यंत्रनेने जुन्नरमधील या युवकाकडे केली. तेव्हा हा माझा पूर्वीचा नंबर होता. मागील वर्षी या नंबरचे सीम कार्ड माझ्याकडून हरविले. पण सिमकार्ड हरविल्याची तक्रार मी पोलिसांकडे केली नव्हती. आता दिल्लीमधील ज्या व्यक्तीकडे हे सिमकार्ड आहे,  ती व्यक्ती यापूर्वी जुन्नर येथे एका हॉटेलमध्ये कामास होती. तसेच सध्या ही व्यक्ती दिल्ली येथे फोटोग्राफीचा व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली आहे.

- Coronavirus : भारतात कोरोनाचे थैमान सुरुच; मृतांची संख्या वाढतीये...

दिल्ली येथील कार्यक्रमात संबधीत व्यक्ती फोटो काढण्यासाठी गेला असल्याची शंका आहे. या युवकाचे सिमकार्ड त्या व्यक्तीकडे गेले असावे किंवा त्या इसमाने सिमकार्ड मूळ मालकाच्या नावावरच ठेवून वापरले असावे असाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. आता तपास यंत्रणेचे फोन या व्यक्तीला जात असल्याने त्याने फोन बंद ठेवला आहे. आणि जुन्नरमधील युवकाच्या सध्याच्या सुरू असलेल्या नंबरवर फोन फॉरवर्ड करून ठेवलेले आहेत.

 - Coronavirus : तबलीगींच्या मौलानाने घेतला यू-टर्न; म्हणाला, 'मी स्वत: ...'

दरम्यान, जुन्नरमधील युवकाची महसूल विभागाने कसून चौकशी केली. तसेच सिम कार्ड हरविल्याबद्दल आणि दिल्ली येथे कधीही न गेल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र या युवकाकडून लिहून घेतले आहे. परंतु जुन्नर नगरपालिका प्रशासनाने संबंधीत यादीमध्ये तुमचे नाव, पत्ता असल्याने तुम्हाला कोरोनासाठी टेस्ट करण्यासाठी पुणे येथे जावे लागेल, असे सांगितले. त्यानुसार जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून सदर युवक पुण्यातील नायडू रुग्णालयात गेला. तेथे त्याची रक्ततपासणी तसेच अन्य तपासणीचे नमुने घेण्यात आले. रिपोर्टमध्ये त्याला कोणताही आजार नसल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. शासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीत खोडद येथील एका युवकाचे देखील नाव असल्याची माहिती पुढे आली आहे.

loading image
go to top