esakal | 'ती’च्या कर्तृत्त्वाला अनोखा सलाम! ‘सकाळ’तर्फे ‘नारी सन्मान’ सोहळा उत्साहात

बोलून बातमी शोधा

Sakal_Naari_Sanman}

महिलांनी आपल्यामध्ये न्यूनगंड आणता कामा नये, तसेच अतिआत्मविश्‍वासही घातक ठरू शकतो.

'ती’च्या कर्तृत्त्वाला अनोखा सलाम! ‘सकाळ’तर्फे ‘नारी सन्मान’ सोहळा उत्साहात
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महिला अष्टपैलू असतात. त्या कोणतीही जबाबदारी सहजपणे पार पाडू शकतात. त्यामुळे बदलत्या काळात आधुनिकतेची कास धरून स्वयंविकासाचे उद्दिष्ट साध्य करायला पाहिजे. अन् त्यासाठी आत्मविश्वास मोलाचा ठरतो, असा सूर ‘सकाळ’ आयोजित ‘नारी सन्मान’ या कार्यक्रमामधून सोमवारी (ता.८) निघाला.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात जीएसटी विभाग पुणे व कोल्हापूरच्या जॉइंट कमिशनर वैशाली पतंगे, परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे, शहर अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे या प्रमुख पाहुण्या म्हणून या प्रसंगी उपस्थित होत्या.‘सकाळ’च्या कार्यकारी संपादक शीतल पवार यांनी स्वागत केले. 

अंगणवाडी सेविकेमुळे महिलेला सासरच्यांकडून परत मिळाले बाळ; जुन्नरमधील घटना​  

नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, मानसी देशपांडे, राजश्री शिळीमकर, अश्विनी भागवत, ज्योती कळमकर, मंजुश्री खर्डेकर, अॅड. जयश्री नांगरे, पल्लवी जगताप, डॉ. आशा गावडे, आश्लेषा मुंगरवाडी, डॉ. सारिका भाडळे, डॉ. ममता दिघे, सरला चांदेरे, दिशा ससार, अपूर्वा निकाळजे, डॉ. निवेदिता एकबोटे यांचा पुस्तक, सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र देऊन प्रसंगी सन्मान करण्यात आला.

मोरे म्हणाल्या, ‘‘महिला दिनाला संघर्षाची किनार आहे. महिला सबलीकरण, सक्षमीकरण खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. महिला आता कुटुंब संस्थेची चौकट ओलांडून समाज संस्थाही सांभाळायला लागल्या आहेत. त्यामुळे महिलांची जबाबदारी दुहेरी आहे. तसेच आपण हे सर्व करताना आपल्याला समाजातील इतर महिलांनाही हात द्यायला हवा.’’

‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस यांनी आभार मानले, तर उपसंपादक सुवर्णा येनपुरे-कामठे यांनी सूत्रसंचालन केले.

'सुई से डर नहीं लगता डॉक्टर'; लस घेताना हसणाऱ्या पोलिसाचा VIDEO तुफान व्हायरल​

महिलांनी व्हर्च्युअल रिॲलिटी म्हणजेच समाजमाध्यमांच्या जाळ्यातून बाहेर पडायला हवे, आणि वास्तविक जीवनात स्वतःचे अस्तित्व निर्माण करायला हवे. प्रत्येक छोट्या-छोट्या लढ्यामधून व्यापक बदल होत असतो, त्यामुळे हा लढा छोटा असला तरी संघर्ष करता आला पाहिजे. आता आपण संघर्ष केला तर येणाऱ्या नव्या पिढीतील मुलींना याचा फायदा होईल.
- वैशाली पतंगे, जॉइंट कमिशनर, जीएसटी विभाग पुणे व कोल्हापूर

महिलांनी आपल्यामध्ये न्यूनगंड आणता कामा नये, तसेच अतिआत्मविश्‍वासही घातक ठरू शकतो. महिलांनी दिसण्यापेक्षा कृतीला महत्त्व दिले पाहिजे. विचारातून समाज आणि परिणामी देश घडत असतो. महिला पिढी घडवत असते, त्यामुळे देशाला एक सजग नागरिक देण्याचे काम ती करत असते.
- डॉ. प्रियांका नारनवरे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)