

Rift Among Jain Boarding Trust Trustees Over Land Deal One Trustee Resigns
Esakal
जैन बोर्डिंग जमीन व्यवहारावरून सुरू झालेला गदारोळ अजूनही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मित्रानेच ही जागा खरेदी केल्यानं त्यांच्यावर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आरोप केले होते. यानंतर आता हा व्यवहार रद्द करण्यासंदर्भात बिल्डर विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंगला मेल केला आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावरून हा व्यवहार रद्द करण्यात येत आहे असं त्यांनी म्हटलंय. दरम्यान, जैन बोर्डिंगच्या ट्रस्टींमध्येच जमीन व्यवहारांवरून मतभेद असल्याचं आता समोर आलंय.