कोल्हापूरचा जवाहर शेतकरी साखर कारखाना अव्वल

sugar factory
sugar factory Sakal Media

पुणे : राज्यात यंदा उसाचे क्षेत्र अधिक असूनही २०२०-२१ चा गाळप हंगाम पावसाळ्यापूर्वी पार पडला. या हंगामात एक हजार १२ लाख टन उसाचे गाळप झाले असून, १०६ लाख टन साखरेचे उत्पादन घेण्यात आले आहे. कोल्हापूरचा जवाहर शेतकरी साखर कारखाना गाळप आणि साखरेच्या उत्पादनात अव्वल ठरला. इथेनॉलच्या उत्पादनामुळे साखरेचा सरासरी उतारा १०.५० टक्क्यांवर आला आहे. परंतु इथेनॉल निर्मितीसाठी साखरेचा कमी झालेला उतारा विचारात घेऊन शेतकऱ्यांना अंतिम रक्कम दिली जाणार असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी गुरुवारी दिली. या पत्रकार परिषदेस साखर संचालक (अर्थ) ज्ञानदेव मुकणे, साखर संचालक (प्रशासन) उत्तम इंदलकर, सहसंचालक (उपपदार्थ) डॉ. संजय भोसले, सहसंचालक (विकास) पांडुरंग शेळके आणि सहसंचालक (प्रशासन) राजेश सुरवसे उपस्थित होते.

sugar factory
दिलासादायक! पुणे शहरात दहा दिवसांत चार हजार खाटा झाल्या रिकाम्या

साखर आयुक्त गायकवाड म्हणाले, राज्यात यावर्षी ९५ सहकारी आणि ९५ खासगी अशा एकूण १९० साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर शेतकरी साखर कारखान्याने राज्यात सर्वाधिक १८ लाख ८८ हजार टन उसाचे गाळप केले. तसेच, सर्वाधिक २२ लाख ९२ हजार टन साखर उत्पादित करून ५२८ कोटींची रक्कम उसबिलापोटी शेतकऱ्यांना दिली. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील दालमिया भारत शुगर या खासगी कारखान्याने सर्वाधिक १३.३९ टक्के साखर उतारा मिळवला. सर्वाधिक हंगाम जालना जिल्ह्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे कारखान्यात २०८ दिवस चालला. तसेच, सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील सोनहिरा साखर कारखान्याने शेतकऱ्यांना उसाला सर्वाधिक प्रतिटन तीन हजार १७६ रुपयांचा दर दिला. सातारा जिल्ह्यातील खंडाळा शेतकरी कारखान्याने सर्वात कमी २७ हजार टन उसाचे गाळप करून १७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले. तर, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळच्या जाकरया शुगर कारखान्याचा सर्वात कमी ५.५७ टक्के साखर उतारा राहिला.

sugar factory
पुणे: मांजरीमध्ये ऑगस्टअखेर कोव्हॅक्सिन लसीच्या उत्पादनाला होणार सुरुवात

राज्यातील ऊस गाळप, टॉप टेन कारखाने (लाख मेट्रिक टन) :

जवाहर शेतकरी सहकारी साखर हुपरी (जिल्हा कोल्हापूर) १८.८८

इंडिकॉन डेव्हलपर्स (अंबिका शुगर्स) कर्जत (जि.नगर) १६.०८

विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना पिंपळनेर (जि. सोलापूर) १५.०२

ज्ञानेश्वर साखर कारखाना नेवासा (जि.नगर) १४.५०

गुरू कमोडिटी (जरंडेश्वर शुगर) कारखाना (सातारा) १४.३८

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखाना संगमनेर (जि.नगर) १२.७६

बारामती ॲग्रो कारखाना इंदापूर (जि. पुणे) १२.७६

माळेगाव साखर कारखाना बारामती (जि. पुणे) १२.६८

मुळा कारखाना नेवासा (जि. नगर) १२. ५८

गंगामाई इंडस्ट्रीज शेवगाव (जि. नगर) १२.५५

राज्यातील साखर उत्पादन, टॉप टेन कारखाने (लाख मेट्रिक टन) :

जवाहर शेतकरी सहकारी साखर हुपरी (जिल्हा कोल्हापूर) २२.९२

इंडिकॉन डेव्हलपर्स (अंबिका शुगर्स) कर्जत (जि.नगर) १७.०१

गुरू कमोडिटी, सातारा १६.५६

ज्ञानेश्वर साखर कारखाना नेवासा (जि.नगर) १५.६०

सह्याद्री साखर कारखाना, सातारा १५.४९

श्री. दत्त शेतकरी शिरोळ, जि. कोल्हापूर १४.८२

यशवंतराव मोहिते कारखाना कराड, जि. सातारा १४.७६

विठ्ठलराव शिंदे कारखाना पिंपळनेर, जि. सोलापूर १४.७१

माळेगाव कारखाना बारामती, जि. पुणे १४.२५

दालमिया शुगर, पन्हाळा जि. कोल्हापूर १३.८४

गाळप हंगाम ऊस गाळप साखर उत्पादन

२०१९-२० ५४५ लाख टन ६१ लाख टन

२०१८-१९ ९५२ लाख टन १०७ लाख टन

sugar factory
पुणे : एक नगरसेवक एक लसीकरण केंद्र; संख्या झाली दुप्पट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com