Junnar Election Result 2021 : जाणुन घ्या जुन्नर तालुक्यात कोण आघाडीवर कोण पिछाडीवर

Junnar Election Result 2021 Pune Gram Panchyat Election
Junnar Election Result 2021 Pune Gram Panchyat Election

नारायणगाव (पुणे) :  वारूळवाडी (ता.जुन्नर) ग्रामपंचायतीत गणपिरबाबा ग्रामविकास व भागेश्वर ग्रामविकास या दोन पॅनेल मध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत. गणपिर बाबा ग्रामविकास पॅनेलचे सतरा पैकी दहा उमेदवार विजयी झाले.ग्रामपंचायतीची सत्ता सलग तिसऱ्यांदा ताब्यात ठेवण्यात गणपिरबाबा पॅनेल प्रमुखांना यश आले.भागेश्वर ग्रामविकास पॅनेलचे  सात उमेदवार विजयी झाली.

वारूळवाडी ग्रामपंचायतीत गणपिरबाबा पॅनेलची विजयाची हॅट्रिक
प्रभाग क्रमांक पाच मधून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विपुल फुलसुंदर यांचा धक्कादायक पराभव झाला. माजी सरपंच जंगल कोल्हे सर्वाधिक ७७४ मतांनी विजयी झाले. त्यांनी जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ यांचे पुतणे सतेज भुजबळ यांचा पराभव केला. ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे यांची स्नुषा प्रमिला पाटे यांचा नऊ मतांनी पराभव झाला.

Indapur Election Result 2021 : पहिल्या 37 ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची जोरदार मुसंडी

गणपिरबाबा पॅनेलचे विजयी उमेदवार(कंसात मिळालेली मते) :
राजेंद्र मेहेर (४५१),राजेश्री  काळे( ३८९) माया डोंगरे (३९१) शुभांगी कानडे (३२२),प्रकाश भालेकर (बिनविरोध) किरण आल्हाट (५१५), ज्योती  संते (५८७), जंगल कोल्हे (७५४), स्नेहल कांकरिया( ६९२) संगीता काळे(६५६)२)

भागेश्वर ग्रामविकास आघाडी उमेदवार :
देवेंद्र बनकर( ४७८), वैशाली  मेहेर(५०७) शाम  दुधाने(४८३),आत्माराम संते( ५०७), विनायक भुजबळ( ५४०) रेखा  फुलसुंदर(५३४),सोनल अडसरे(५४६)

वारूळवाडी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या सतरा आहे. प्रभाग क्रमांक तीन मधून गणपिर बाबा पॅनेलचे प्रकाश भालेकर यांची बिनविरोध निवड झाली होती. सहा प्रभागातून सोळा जागांसाठी बत्तीस उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ७५.१४ टक्के मतदान झाले होते. 

भागेश्वर पॅनेलला अनिल मेहेर, प्रकाश पाटे, रमेश भुजबळ, आशिष फुलसुंदर या मातब्बर जेष्ठांनी पाठिंबा दिल्याने व प्रचारात ते सक्रिय झाल्याने निवडणूकीतील रंगत आली होती.

Purandar Election Result: पुरंदर तालुका ग्रामपंचायतीवर शिवसेनेचं वर्चस्व; जाणून...

गणपिर बाबा पॅनेलचे नेतृत्व युवा उद्योजक संजय वारुळे, जालिंदर कोल्हे यांनी केले. ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथमच जेष्ठ विरुध्द युवा असा सामना रंगला होता. गणपिरबाबा पॅनलने ग्रामपंचायतीची सत्ता तिसऱ्यांदा ताब्यात घेऊन विजयाची  हॅट्रिक केली आहे. कोल्हे, बनकर, संते या तीन माजी सरपंच, राजेंद्र मेहेर, माया डोंगरे, रेखा फुलसुंदर या तीन माजी सदस्यांचा विजय झाला. उद्योजक वारुळे व कोल्हे यांच्या हस्ते गणपिर बाबा पॅनेलच्या विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.

भागेश्वर पॅनेलच्या विजयी उमेदवारांचा सत्कार कृषि विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर यांच्या हस्ते करण्यात आला.

Pune Gram Panchyat Election Result 2021 Live Updates : कोण पुढे? कोण मागे? ग्रामपंचायत निवडणूक निकाल अपडेटस् एका क्लिकवर

''मागील पाच वर्षात केलेली विकास कामे, पारदर्शक कारभार यामुळे गणपिर बाबा पॅनेलचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. राजकीय जोडे बाजूला ठेऊन सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन  गावच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल.''
- संजय वारुळे( गणपिर बाबा पॅनेल प्रमुख) 

पिंपरी पेंढारमध्ये आठ जागांसाठी झाली चुरशीची लढत

पिंपळवंडी : जुन्नर तालुक्याच्या राजकारणात महत्वाचे स्थान असलेल्या पिंपरी पेंढार गावची निवडणुक यावेळी रंगतदार झाली. सुरुवाती पासुनच गाव बिनविरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले त्यात त्यांना यश आले नाही.एकुण पंधरा सदस्य संख्या असलेल्या या गावात सात उमेदवार हे बिनविरोध निवडुन आले तर उर्वरीत  आठ जागांसाठी पंधरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. 

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार-

संतोष दुरगुडे, सुप्रिया कुटे, अमोल वंडेकर, संतोष कुटे, संदिप वाघ, रूपाली कुटे, सुरेखा वेठेकर.

विजयी उमेदवार-

सुवर्णा वेठेकर, शैला जाधव, अनिता कुटे, सविता पोटे, बाळशिराम खिल्लारी, शैलेश जाधव, दत्तात्रय चव्हाण, दिपाली कुटे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com