जुन्नर बाजार समितीला कोरोनाचा मोठा फटका; तब्बल...

रवींद्र पाटे 
रविवार, 24 मे 2020

जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील टोमॅटो, कांदा व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.

नारायणगाव (पुणे) : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाउनच्या निर्णयामुळे जुन्नर बाजार समितीचे उपबजार मागील दोन महिने बंद ठेवावे लागले आहेत. यामुळे  दोन महिन्यांत  बाजार समितीच्या उलाढालीत सुमारे दोनशे कोटी रुपयांची घट झाली आहे. याचा फटका प्रामुख्याने जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील टोमॅटो, कांदा व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे, अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली.

पुण्यातील पोलिसांनी घडविले `असे` माणुसकीचे दर्शन...

सभापती काळे म्हणाले, जुन्नर बाजार समिती जिल्ह्यात अग्रेसर आहे. बाजार समितीचे जुन्नर, नारायणगाव, ओतूर, आळेफाटा, बेल्हे येथे उपबजार आवार आहेत. मागील वर्षी फळ, भाजीपाला व जनावरे खरेदी विक्रीतून बाजार समितीची सुमारे एक हजार दोनशे  कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. बाजार समितीचा टोमॅटो, कांदा व जनावरे खरेदी विक्रीचा बाजार राज्यात आग्रेसर आहे. बाजार समितीच्या विविध उपबजारात फळे व भाजीपाला खरेदी विक्रीतून रोज तीन ते साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल होते.

खासदारपदाच्या हॅटट्रिकच्या वर्षपूर्तीनिमित्त सुप्रिया सुळे यांनी केलाय `हा` संकल्प

जुन्नर तालुक्या लगत असलेल्या पुणे व मुंबई शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लोकडाउनचा निर्णय घेण्यात आला. यामुळे पुणे, मुंबई व अन्य राज्यातील बाजार समितीतील व्यवहार बंद झाले. वाहतूकही  बंद झाल्याने व्यपाऱ्यांनी खरेदी बंद केली. परप्रांतीय  व्यापारी व कामगार निघून गेले. यामुळे २४ मार्च पासून जुन्नर बाजार समितीने उपबजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मागील दोन महिन्यापासून बाजार समितीचे व्यवहार ठप्प झाले. व्यापाऱ्यांअभावी फळे व भाजीपाला विक्री न झाल्याने शेतमालाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

युवतीला विमान चालविण्याचे प्रशिक्षण देताना 'त्याने' केले हे कृत्य; अन् मग...

खोडद येथील जीएमआरटी (महाकाय दुर्बीण) प्रकल्पामुळे तालुक्यात औद्योगिक विकासाला मर्यादा असल्याने येथील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेती उत्पादनावर अवलंबून असतो. उन्हाळी हंगाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा असतो. हा हंगाम वाया गेल्याने पुढील वर्षभर शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

कांदा व टोमॅटो उत्पादकांना मोठा फटका

कांदा व टोमॅटोची काढणी मार्च महिन्यात सुरू झाली. त्या नंतर आलेल्या कोरोना संकटामुळे उपबजार बंद ठेवावे लागले.टोमॅटो शेतातच लाल झाली.शेतकऱ्यांनी कांदा शेतात झाकून ठेवाला.मात्र वाढलेले तापमान व नुकताच झालेला पाऊस या मुळे  कांदा सडु लागला आहे.टोमॅटोचा उन्हाळी हंगाम वाया गेल्याने व कांदा सडू लागल्याने शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, असे सभापती काळे म्हणाले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Junnar market committee closed for two months: Decrease in turnover by Rs 200 crore