Pankaja Munde: "...काहींना पाहावत नाही"; ठाकरेंच्या फोन प्रकरणावर पंकजा मुंडे अखेर बोलल्या

उद्धव ठाकरेंनी पक्षाचं नाव आणि चिन्ह गमावल्यानंतर पंकजा मुंडेंनी त्यांना फोन करुन विचारपूस केल्याची चर्चा होती.
pankaja munde dasara melava 2022
pankaja munde dasara melava 2022esakal

पुणे : उद्धव ठाकरेंनी पक्षाचं नाव आणि चिन्ह गमावल्यानंतर पंकजा मुंडेंनी त्यांना फोन करुन विचारपूस केली होती. या फोन प्रकरणावरुन चर्चेला तोंड फुटल्यानंतर दोघांमध्ये नक्की काय बोलणं झालं हे सांगण्यात त्यांनी नकारही दिला होता. पण आज त्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी त्या आज मतदारसंघात भाजपच्या प्रचारात सामिल झाल्या होत्या. (Kasba By Election Pankaja Munde finally spoke on Uddhav Thackeray phone call)

pankaja munde dasara melava 2022
ShivSena Row: शिवसेना भवनही ठाकरेंच्या हातून जाणार का? धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल

पंकजा मुंडे म्हणाले, "कसबा मतदारसंघात आज हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी रोडशो आयोजित करण्यात आला होता. त्याला लोकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कसबा पोटनिवडणुकी भाजपचा विजय निश्चित आहे. मागील तीन दिवसांपासून मी पुण्यात मुक्काम ठोकून आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा मी प्रचार करत आहे. ज्यांना माझा प्रचार पाहावत नाही ते अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत. मी करत असलेला प्रचार ज्यांना आवडत नाही, तेच अशा प्रकारच्या बातम्या करत आहेत"

pankaja munde dasara melava 2022
Oppositon Parties rally in Mumbai: मुंबईत देशभरातील विरोधकांची होणार सभा; उद्धव ठाकरे करणार नेतृत्व

बापटांच्या प्रचारावर केलं भाष्य

आजारी असतानाही खासदार गिरीश बापट यांना भाजपच्या प्रचारासाठी मैदानात उतरवल्यानं भाजपवर मोठी टीका झाली होती. यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, "भाजपच्या जन्मापासून गिरीश बापट भाजपसोबत आहेत. आजवर त्यांनी पक्षासोबत काम केलं विधानसभेत काम केलं आहे. ते लोकसभेत गेले. एवढं आयुष्य पक्षासाठी वेचल्यानंतर निवडणुकीत भाग घेण्याची उत्सुकता त्यांनाही असेल. हेमंत रासनेंना आशीर्वाद देण्याची त्यांचीही इच्छा असेल तर यात वावगे काय?"

कसबाच नाही तर प्रत्येक निवडणुकीकडं आम्ही चुरशीची निवडणूक म्हणूनच पाहतो. या निवडणुकीत आम्हाला जास्तीत जास्त मते घ्यायची आहे. निवडणूक चुरशीची जरी असली तरी आम्हाला विजयाबद्दल अजिबात शंका नाही. जास्तीत जास्त मते घेऊनच आम्हाला विजयी व्हायचं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com