कात्रज डेअरीमधील डी. पी. रस्त्याचा प्रश्न मार्गी

road
roadfile photo

कात्रज- कात्रज डेअरीमधून वंडरसिटीकडे जाणाऱ्या डी. पी. रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून रस्ता मंजूर झाल्यानंतर रस्त्यांसाठी महापालिकेकडून तरतूद करण्यात आली आहे. मागील २० वर्षांपासून सदरचा रस्ता होण्यासाठी नागरिकांमार्फत मागणी होत होती. खासकरून वंडर सिटी परिसरातील नागरिकांना याचा फायदा होणार होता. तसेच, धनकवडी, आंबेगाव पठारवरील वाहतूक कात्रज चौकाकडे जाण्यास यामार्गे सोयीची ठरणार आहे.

त्रिमूर्ती चौक-भारती विद्यापीठमागील गेट-मैत्री चौक-कात्रज बायपास असा हा मार्ग होणार आहे. कात्रज डेअरीच्या काही मागण्या तडजोड होत नसल्याने रस्त्याचे काम रखडले होते. याप्रकरणी स्थानिक नगरसेवक युवराज बेलदरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधला होता. पुणे महापालिकेने कात्रज डेअरीमधील रस्ताच्या कामात डेअरीच्या मालकीचे असणारे १ मिल्क पार्लर, ८ कामगारांची घरे, सीमा भिंत यांचा मोबदला देण्याचे ठरले. यामध्ये ८ घरांची व पार्लरची रक्कम १ कोटी 6 लक्ष रुपये थेट कात्रज डेअरीकडे जमा करण्यात येणार आहेत.

road
पुण्यातील कात्रज चौकातील कोंडी फुटणार; उड्डाणपुलासाठी केंद्राकडून १६९.१५ कोटी मंजूर 

यासाठी नुकतीच स्थायी समितीने मान्यता दिली असून सीमा भिंत महापालिका पथ विभागामार्फत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ५६ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर २०० मी लांबीच्या रस्त्यासाठी २ कोटी ५० लक्ष रुपयांची वेगळी तरतूद असणार आहे. सदरच्या रस्त्याचे काम पूर्ण होण्यास ४ महिन्यांचा कालावधी आहे. या रस्त्याच्या कामात कात्रज डेअरीची एकूण ४४१० स्के.मीटर जागा बाधित होत आहे.

road
कात्रज घाटातील कचरा घेण्यास महापालिकेच्या घनकचरा विभागाचा नकार

२०१७ पासून या रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा करत असून त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मध्यस्थीने यश आले आहे. आता लवकरच रस्ता होईल आणि परिसरातील वाहतूक कोंडी फुटेल, असं स्थानिक नगरसेवक युवराज बेलदरे म्हणाले. मागील कित्येक दिवसांपासून या रस्त्यावरुन प्रवास करत असताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. हा रस्ता जेवढा लवकर होईल तेवढ्या लवकर नागरिकांची या वाहतूक कोंडीतून सुटका होईल, असं स्थानिक नागरिक बाळासाहेब गदळे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com