खडकवासला मनोरंजन पार्कच्या निविदेबाबत झाला 'हा' महत्त्वाचा निर्णय 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 29 June 2020

"खडकवासला येथील पाटबंधारे विभागाच्या २८ एकर जागेवर मनोरंजन पार्क उभे करण्यासाठी निविदा प्रक्रिया भरण्याची मुदत ८ जुलै पर्यत वाढविली आहे." अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी 'सकाळ' शी बोलताना दिली. 

खडकवासला (पुणे) : "खडकवासला येथील पाटबंधारे विभागाच्या २८ एकर जागेवर मनोरंजन पार्क उभे करण्यासाठी निविदा प्रक्रिया भरण्याची मुदत ८ जुलै पर्यत वाढविली आहे." अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी 'सकाळ' शी बोलताना दिली. कृष्णा खोरे विकास महामंडळाने खडकवासला धरण परिसरात धरणाच्या उभारणी करण्यासाठी जागा ताब्यात घेतली होती. त्यातील उर्वरित जागा रिकामी आहे.  खडकवासला व कोपरे गावाच्या हद्दीतील ही जागा आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

धरण परिसरातील वेगवेगळ्या तीन ठिकाणी ही जागा आहे. ही जागा बांधा वापरा व हस्तांतरण करा या बीओटी तत्वावर भाड्याने देण्यासाठीची निविदा १० जूनच्या पहिल्या आठवड्यात काढण्यात आली होती. निविदा २३ जूनपर्यत भरण्याची मुदत होती. २५ जून रोजी निविदा काढण्यात येणार होत्या. परंतु, यातील काही इच्छुकांनी निविदा भरण्यासाठी कालावधी वाढविण्याची मागणी केली होती. त्यानुसार, ही काढण्याची मुदत ८ जुलैपर्यंत वाढविली आहे. १० जुलैला निविदा काढल्या जाणार आहेत. दरम्यान, मनोरंजन पार्क उभारण्यासाठी सुमारे 8 ते 10 जण इच्छुक आहेत. ही संख्या वाढू शकते असे ही पाटील यांनी सांगितले.

'पुण्याची पीएमपी व्हेंटिलेटरवर; करार रद्द करण्यासाठी कंत्राटदारांना नोटिस

गार्डनचा प्रस्तावित आराखडा  : 
एकूण २८ एकरामध्ये धरणाच्या भिंतीलगत मोकळ्या जागेत मुख्य बाग, धरणाच्या दोन्ही बाजूस रस्त्यालगत उपबागा, मुख्य बागेत अॅम्युजमेंट पार्क, वस्तू संग्रहालय, आकर्षक मत्स्यदर्शन केंद्र, संगीतमय कारंजी, हॉटेल्स, रिसॉर्ट, बहुउद्देशीय सभागृह, उत्तमोत्तम फुलझाडे, वृक्षराजी, स्थानिक झाडे, वेली अशी ही बाग साकारली जाणार आहे. या बागेमुळे खडकवासला धरणालगत सर्वोत्तम भव्य पर्यटन केंद्र उभे राहणार आहे. सुमारे २५- ३० कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.

 StartupStory: सोशल डिस्टन्सिंगसाठी तरुणानं डोकं लढवलं; तुम्हीही कराल कौतुक

खासदार सुळेंचा पाठपुरावा :
म्हैसूर येथील वृंदावन गार्डन, कृष्णराजसागर धरण, पैठणच्या नाथसागर धरणालगत बाग आहे. अशा प्रकारे खडकवासला धरणालगत बाग करणार असे निवडणुकी दरम्यान वचननाम्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले होते. विधानसभा निवडणुकी नंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे बागेसाठी पाठपुरावा सुरू केला. १८ फेब्रुवारी २०२० रोजी पुन्हा पत्र पाठविले होते.
आधुनिक, सर्व सुविधा असणारे पर्यटन केंद्र उभे केले जात आहे.

प्राथमिक ऊर्जावापरात भारत तिसऱ्या स्थानावर

खडकवासला परिसरात पर्यटनासाठी मोठी संधी असल्यामुळे महामंडळाच्या रिकाम्या जागेचा वापर करून महसूल मिळणार आहे. ही 28 एकर जागा आहे. ती 30 वर्षांसाठी बीओटी तत्वावर देणार आहे. त्याबाबत निविदा मागविल्या आहेत. तीस वर्षानंतर तो प्रकल्प महामंडळाला आहे तसा हस्तांतरण करावा लागेल. 
-विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khadakwasla Amusement Park extends tender deadline