महत्वाची बातमी : पुणे महापालिकेतील 'हे' नगरसेवक येणार अडचणीत? 

ncp.jpg
ncp.jpg

कॅन्टोन्मेंट : महापालिकेच्या वतीने कंटेन्मेंट झोनमध्ये प्रत्येक कुटुंबाला 800 रुपयांचे कीट वाटप करण्यात येत आहे. ही जबाबदारी स्थानिक नगरसेवकांकडे दिली असल्यामुळे काहीं नगरसेवकांनी आपला मतदारवर्ग डोळ्यासमोर ठेवून धान्य कीट देऊ केले आहे.  तर या कीटमध्येही पालिकेने ठरवून दिलेल्या मालाच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचे धान्य दिले जात आहे. असल्याची तक्रार भवानी पेठ कासेवाडी येथील नागरिकांनी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेड झोन एरियामधील कुटुंबांना साखर 2 कि. 72 रु., आटा 5 कि. 145 रु., तेल (सनफ्लॉवर रिफाइंड) 2 कि. 200 रु., तूरडाळ 1 कि. 90 रु., तांदूळ 2 कि. 70 रु., पोहे 1 कि. 45 रु., मीठ 1 कि. 11 रु., साबण लाइफबॉय-56 ग्रॅम 1 नग, 11 रु., साबण व्हिल अॅक्टीव 1 नग, 5 रु., मिरची पावडर 200 ग्रॅ. 39 रु., चहा पावडर 200 ग्र. 60 रु. पॅकिंग पिशवी 1 नग 8 रु., दूध पावडर 200 ग्रॅ. 38 रु., ट्रान्सपोर्ट व नफा 10. लोगो 5 रु. असे एकूण 808 रुपयांचे कीट बनवून द्यायचे आहे. मात्र, यामध्येसुद्धा हलक्या प्रतीचा माल देऊन नागरिकांची फसवणूक केली जात आहे.

तसेच रेशनकार्डाची अट नसताना ग्राह्य धरली जात आहे त्यामुळे भाडेकरी वर्गावर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. पालिकेच्या धोरणानुसार गवणी घोषित असलेल्या भागामध्ये हे वाटप होण अपेक्षित आहे. मात्र अनेक आपला मतदार ओळखून सोसायटीच्या भागात गरज नसतानाही काही नगरसेवकांनी हे कीट वाटप केल्याने झोपडपट्टीभागातील नागरिक या धान्यापासून वंचित आहे. 

कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असल्याने शहरातील पेठ आणि काही विभागामध्ये रेड झोन एरिया जाहीर केला आहे. या ठिकाणाच्या नागरिकांना अन्नधान्य मिळावे यासाठी महापालिकेने हा उपक्रम सुरू केला आहे. मात्र, स्थानिक नगरसेवकांच्या मनमानीमुळे अनेक नागरिक धान्यापासून वंचित आहे. तर ज्यांना धान्य मिळाले आहे, तेसुद्धा निकृष्ट दर्जाचे असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

या किट मध्ये तांदळाचा दर ३५ रु. किलो असल्याचे नमूद आहे. मात्र नागरिकांना चक्क रेशनिंगचे तांदूळ वाटप झाले आहे. अनेकांना कीटमध्ये दिलेल्या वस्तूही गायब आहेत. तर अनेक नागरिक या धान्यापासून वंचित आहेत. नागरिकांचे हित जाणून शासनाने हा उपक्रम सुरु केला आहे. मात्र त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना दिसत नाही. नागरिकांना  दिलेल्या धान्याचा काळाबाजार केल्याप्रकरणी या गोष्टीची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी रिपाई पुणे शहर अध्यक्ष अशोक शिरोळे यांनी केली आहे.     

नगरसेविका अर्चना पाटील यांचे पती तुषार पाटील यांनी सांगितले की, मनपामार्फत क्षेत्रीय कार्यालयाकडून माझ्याकडे आलेल्या कीटमध्ये रेशनिंगचे तांदूळ असल्याचे खरे आहे. तसेच अनेक कीटमध्ये काही वस्तूही गायब आहेत. याबाबत आम्ही मनपाकडे तक्रार करून सबंधित ठेकेदाराला बिल न देण्याची मागणीही केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

तसेच नगरसेवक अविनाश बागवे यांनी बोलताना सांगितले कि, ''आम्ही वाटप केलेल्या भागामध्ये एकही नागरिकांची तक्रार आलेली नाही व रेशनिंगच्या तांदळाचा यामध्ये समावेश नाही. आतापर्यत सुमारे ७००० नागरिकांना आम्ही हे कीट वाटप केले आहे.

मनपा उपायुक्त अविनाश सपकाळ यांनी सांगितले की, ''एकूण नऊ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कॅन्टेन्मेंट घोषित भागामध्ये राहणाऱ्यांना आतापर्यत सुमारे ५३, ६५६ पेक्षा अधिक नागरिकांना हे कीट वाटप करण्यात आले आहे. यासाठी रेशनिंग कार्डाची आवश्यकता नाही. तसेच कुठल्याही कीटमध्ये अजिबात रेशानिगचे तांदूळ दिले गेले नाही. सुमारे ७ ते ८ वेंडर मार्फत हे कीट बनविण्याचे काम सुरु आहे. तेल हे कीटमध्ये फुटले जातात त्यामुळे त्यांना नंतर दिले जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com