

Maharashtra Celebrates as Dapoli's Prajakta Bongale Joins the U.S. Army
sakal
पुणे: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीच्या कन्या प्राजक्ता (सारा) बोंगाळे यांनी अमेरिकन सैन्यदलाचे अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून ऐतिहासिक भरारी घेतली आहे. या देदीप्यमान यशामुळे अमेरिकन सैन्यात सेवा देणाऱ्या त्या महाराष्ट्रातील पहिल्या मराठी महिला ठरल्या आहेत.