पुणे महापालिकेचा कारभार! कोट्यावधी रूपये खर्चून उभारलेली प्रयोगशाळा वापराविना पडून  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The laboratory is still unused made by PMC Pune  crores of rupees

महापालिकेकडून नऊ वर्षांपूर्वी काही कोटी रुपये खर्च करून कोंढवा येथे एक प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत अन्न व अन्न पदार्थांची तपासणी करण्याचे काम चाले. सहा वर्षांपूर्वी साडेसात कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक उपकरणेही प्रयोगशाळेत बसविण्यात आली आहेत.

पुणे महापालिकेचा कारभार! कोट्यावधी रूपये खर्चून उभारलेली प्रयोगशाळा वापराविना पडून 

पुणे: एकीकडे कोरोनामुळे पुणे महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत आटले असताना दुसरीकडे कोंढवा येथील प्रयोगशाळा भाडेकराराने देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे एक वर्षांपासून प्रलंबित आहे. या निष्काळजीपणामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडत आहे, असा आरोपा सजग नागरिक मंचाने एका पत्राद्वारे केली आहे.

Video : राज्यात पावसाची बॅटिंग सुरूच राहणार; हवामान खात्यानं दिलाय इशारा​ 

महापालिकेकडून नऊ वर्षांपूर्वी काही कोटी रुपये खर्च करून कोंढवा येथे एक प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत अन्न व अन्न पदार्थांची तपासणी करण्याचे काम चाले. सहा वर्षांपूर्वी साडेसात कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक उपकरणेही प्रयोगशाळेत बसविण्यात आली आहेत.

गणेशोत्सवात 'या' चार दिवशी ध्वनीवर्धक रात्री बारापर्यंत सुरू राहणार; पुणे पोलिसांनी केले जाहीर!​

तीन वर्षांपूर्वी मंचाच्यावतीने नागरिकांच्या करांचे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला हा पांढरा हत्ती पोसणे थांबवावे. ही जागायंत्रसामुग्रीसह भाडेकराराने द्यावी. त्यातून महापालिकेला उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन केले होते. त्यानुसार पुणे महानगरपालिकेने निविदा प्रक्रिया राबवून वर्षाला 30 लाख रुपये महापालिकेला उत्पन्न मिळवून देणारा प्रस्ताव सप्टेंबर 2019 मध्ये मुख्य सभेपुढे ठेवला. तो अद्यापही निर्णयाअभावी प्रलंबित आहे. ज्यामुळे महापालिकेचे वर्षभरात तीस लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे, असा आरोप मंचाचे विवेक वेलणकर त्यांनी केला आहे. 

पानशेतही ओव्हर फ्लो; मुठा नदीत पाण्याचा विसर्ग वाढला!​