death.jpg
death.jpg

धक्कादायक ! पाषाणमध्ये  `त्या` मृतदेहाबाबत घडलेला प्रकार वाचून तुम्हीही व्हाल थक्क... 

औंध (पुणे) : पाषाण येथील एका रुग्णाचा मृत्यू आजारपणामुळे झाला की कोरोनाने याची स्पष्टता न झाल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाने त्याचा मृतदेह न उचलता पोलिसांनी उचलला. यामुळे पुन्हा एकदा पालिका प्रशासन व पोलीस यातील समन्वयाचा अभाव दिसून आल्याची चर्चा परिसरात  होत आहे.

संबंधित व्यक्ती ही दक्षिण भारतीय असून पाषाण- सूस रस्त्यावरील कुमार शांतिनिकेतन या इमारतीत पत्नी व मुलीसह राहत होते. त्यांना मूत्रपिंडाचा आजार असल्याने बाणेर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार चालू होते. शुक्रवारी (ता. २९) दुपारी त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या पत्नीने सोसायटीच्या पदाधिका-यांना याविषयी माहिती कळवली. यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले असता पोलिसही हजर झाले. परंतु, संबंधित मृत व्यक्तीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते व त्यांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याचे पोलिसांना समजले.

पोलिसांनी डॉक्टरांशी संपर्क करुन माहिती घेतली असता असा सल्ला दिला होता. परंतु, त्या व्यक्तीने चाचणी न केल्याने ती कोरोना बाधित आहे की नाही याविषयी खात्रीशीर माहिती देता येणार नसल्याचे सांगितले. यानंतर पालिकेच्या औंध क्षेत्रिय कार्यालयाच्या आरोग्य विभागाला कळवून पुढील सोपस्कार करण्यासाठी पाचारण करण्यात आले.

आरोग्य निरिक्षक व कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली व संबंधित रुग्णाचा मृत्यू घरी झाल्यामुळे तसेच मृत्यू प्रमाणपत्र नसल्याने व कोरोना चाचणी केली नसल्याने सामान्य व्यक्तीच्या मृतदेहाप्रमाणे आम्ही हा मृतदेह हलवू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. सोबत आणलेले पीपीई किट व मृतदेह गुंडाळून नेण्याचे साहित्य पोलिसांना देण्यात आले. पोलिसांनी व रुग्णवाहिका चालकाने नवव्या मजल्यावरुन हा मृतदेह 
खाली आणला.

यानंतर हा मृतदेह ससूनला उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. तपासणीत त्याच्या छातीत पाणी झाल्याचे निष्पन्न झाले व ती व्यक्ती कोरोना बाधित नसल्याचा अहवाल आला. परंतु, त्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र नाही म्हणून आरोग्य विभागाकडून मदत न करणे हे अयोग्य असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर आम्ही सर्वतोपरी सहकार्य केल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. या  घटनाक्रमानुसार संबंधित व्यक्तीचा मृतदेह मात्र रात्री साडेदहा अकराच्या दरम्यान दवाखान्यात हलवण्यात आला. तोपर्यंत मयत व्यक्तीच्या पत्नीचे मात्र हाल झाले. 
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा 

संबंधित व्यक्तीचा मृत्यू हा घरी झाल्याने व कोरोनाची तपासणी केली नसल्याने कोविड रुग्णाप्रमाणे त्यांची पुढील प्रक्रिया करता येते नव्हती. कारण त्याची उत्तरीय तपासणी करणे आवश्यक असल्याने रुग्णालयात नेणे गरजेचे होते. सामान्यपणे जसे पोलिस हाताळतात तसेच हे प्रकरण हाताळले गेले आहे. पोलिस प्रशासन व पालिका प्रशासनात कुठलेही मतभेद नाहीत. अशा प्रकरणात आमच्या अधिकारी व कर्मचा-यांनी काम केलेले आहेच. तरीही यापुढे आम्ही काळजी घेऊ.

 - जयदीप पवार, सहायक आयुक्त औंध क्षेत्रिय कार्यालय. 

या गंभीर परिस्थितीत सर्वांनीच माणुसकीच्या नात्याने एकमेकांना मदत करायला हवी. संबंधितांना हवी असलेली मदत आमचे कर्तव्य म्हणून केले आहे. तरीही कुठल्याही प्रशासनातील व्यक्तींनी अशा कठीण प्रसंगी जनतेला मदत करायलाच हवी.

-महेश बामगुडे, पोलीस कर्मचारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com