लोणी, उरुळी परिसरात कोरोनाचे थैमान सुरूच 

corona1
corona1

लोणी काळभोर (पुणे) : पूर्व हवेलीमधील लोणी काळभोर, उरुळी कांचन व कदमवाकवस्ती या तीन ग्रामपंचायत हद्दीत मागिल 24 तासात कोरोनाचे तब्बल 22 नवीण रुग्ण आढळून आले आहेत. तर, कदमवाकवस्ती हद्दीतील कवडी- माळवाडी येखील एका सत्तर वर्षीय महिला रुग्णांचा पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी (ता. ३) मृत्यू झाला. 

लोणी काळभोर, उरुळी कांचन व कदमवाकवस्ती या तीन ग्रामपंचायत हद्दीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अडीचशेवर पोचली असून, त्यापैकी १७० रुग्णांना उपचारानंतर घऱी सोडण्यात आले आहे. तर, सध्या नव्वदहून अधिक रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर, पूर्व हवेलीत सोमवारी (ता. ३) दुपारपर्यंत सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

लोणी काळभोर येथील कोविड केअर सेंटरमधुन सोमवारी सकाळी नव्वद जणांचे स्वॅब (घशातील द्रव) तपासनीसाठी पाठवले असुन, वरील नव्वद जनांच्या स्वॅबचा तपासनी अहवाल आल्यानंतर, वरील तीन ग्रामपंचायत हद्दीतील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा नेमका आकडा समजणार असल्याचेही डॉ. लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्य अधिकारी डॉ. डि. जे. जाधव यांनी स्पष्ठ केले आहे. 

कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एकाच कुटुबांतील सहा जण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे चार दिवसांपूर्वी आढळुन आले होते. या सहा जणांपैकी एका सत्तर वर्षीय महिलेचा सोमवारी दुपारी उपचार चालू असताना मृत्यू झाला. त्यामुळे मागिल आठ दिवसाच्या कालावधीत पूर्व हवेलीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा सहावर पोचला आहे. यापूर्वी उरुळी कांचन, नायगाव, कदमवाकवस्ती, आळंदी म्हातोबाची या चार गावात पाच रुग्ण दगावले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com