काल रात्री घडल्या सर्व घडामोडी, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवारांसोबत

Leader of the NCP with Ajit Pawar.jpg
Leader of the NCP with Ajit Pawar.jpg

पुणे : 'आमचं ठरलं होतं ' काहीही झालं तरी भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होईल, हे निश्चित होतं. त्यासाठी काहीही करण्याची तयारी भाजपच्या नेत्यांनी ठेवली होती. भाजपच्या या प्रयत्नांना आज सकाळी यश आले. या सगळ्या प्रयत्नांचा केंद्रबिंदू पुणे ठरले.

"राष्ट्रवादी काँग्रेस फुटली; अजित पवारांचे बंड 

तोंडाजवळ आलेला सत्तेचा घास कोणत्याही परिस्थितीत सोडायचा नाही आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ द्यायचा नाही, अशी खूणगाठ भाजपने बांधली होती. त्याचाच एक भाग म्हणून थेट राष्ट्रवादी काँग्रेसला फोडुन किंवा राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता बनवण्याची व्यूहरचना गेली चार दिवसांपासून सुरू होती. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्याशी बोलली करत असतानाच अजित पवार यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाची बोलणी सुरू होती. आताच्या बातमीनुसार अजित पवार यांनी काही आमदार सोबत घेऊन भाजपला पाठिंबा दिला आहे. मात्र, काही तासांमध्येच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट होईल, यामध्ये राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा असल्याचे जाहीर होण्याची शक्यता भाजपच्या गोटातून व्यक्त करण्यात येत आहे.

"महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री  

अजित पवार हे शरद पवार यांच्या संमतीविना हा धाडसी निर्णय घेणार नाहीत असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रात एक किंवा दोन मंत्रीपदही या सत्ता संघर्षात मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अद्यापही भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणीही बोलण्यास तयार नाही. राष्ट्रवादीचे नेते या संपूर्ण राजकीय भूकंप बद्दल शॉकमध्ये असल्याचे दिसून येत आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाबरोबरची सत्तास्थापनेची जोडणी ही गेली काही दिवसांपासून वेगाने सुरू होती. यामध्ये अजित पवार यांनी पुढाकार घेतला होता. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हेही असल्याचे भाजपच्या एका नेत्याने सांगितले. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत कोण आहे, याचे चित्र काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. कदाचित येत्या दोन दिवसांमध्ये विधिमंडळाचे अधिवेशन होईल आणि त्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीत काँग्रेसचे नवीन सरकार आपले बहुमत सिद्ध करेल.

अजित पवारांना राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही : शरद पवार

नव्या सरकारच्या स्थापनेबाबत राष्ट्रवादीच्या गोटात अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू आमदार या प्रक्रियेत सहभागी झाले होते.  पुणे जिल्ह्यातील काही आमदारांना या प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले होते.  भाजपसोबत सर्व बोलणी ही पुण्यातून सुरू होती. काल रात्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापुरातील आपला दौरा सोडून मुंबईला रवाना झाले. त्यांनी आज पुण्यातील त्यांचे सर्व कार्यक्रमही रद्द केले, उद्या सकाळी एक महत्त्वाची घटना घडत आहे, असे त्यांनी त्यांच्या निकटवर्तीयांना रात्रीच कळवले होते. भाजपचे सर्व प्रमुख नेते आता मुंबईमध्ये असून नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ स्थापनेबाबत चर्चा सुरू आहे. पण, आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत भूमिकेकडे. हे अजित पवारांचे बंड आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची खेळी? हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे. या संपूर्ण राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला असून, त्याचे दूरगामी परिणाम राज्याच्या राजकारणावर पडणार आहेत  मात्र हे नक्की!
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com