

Leopard Attack
Sakal
-पराग जगताप
ओतूर : ओतूर (ता.जुन्नर) येथे अमीर घाट परिसरातून दुचाकीवर जात असताना एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून त्यास जखमी केले. ओतूर परीसरात वारंवार बिबट्याचे होणारे हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.