Leopard Calf : बिबट्याचे पिल्लू विसावले आईच्या कुशीत!

उसाच्या शेतात अडकलेल्या अवघ्या १५ दिवसांच्या बिबट्याच्या पिल्लाला वाचवून त्याला त्‍याचा आईकडे सोडण्यात वाइल्डलाइफ एसओएस या संस्थेला आणि वन विभागाला यश आले.
Leopard Calf
Leopard CalfSakal
Summary

उसाच्या शेतात अडकलेल्या अवघ्या १५ दिवसांच्या बिबट्याच्या पिल्लाला वाचवून त्याला त्‍याचा आईकडे सोडण्यात वाइल्डलाइफ एसओएस या संस्थेला आणि वन विभागाला यश आले.

पुणे - उसाच्या शेतात अडकलेल्या अवघ्या १५ दिवसांच्या बिबट्याच्या पिल्लाला वाचवून त्याला त्‍याचा आईकडे सोडण्यात वाइल्डलाइफ एसओएस या संस्थेला आणि वन विभागाला यश आले आहे. ही घटना घडली ती जुन्नर येथील कैलासनगर गावाजवळ.

नुकतेच कैलासनगर गावाच्या परिसरात उसाच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरू असताना शेतकऱ्यांना बिबट्याचे एक लहान पिल्लू दिसून आले. या पिल्लाला पाहताच शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती वन विभागाला दिली. दरम्यान वनविभाग आणि वाइल्डलाइफ एसओएस या संस्थेने त्‍वरित घटनास्थळी जाऊन या पिल्लाला ताब्यात घेत त्याची प्राथमिक वैद्यकीय तपासणी संस्थेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने केली.

तपासणी केल्यानंतर पिल्लाची तब्येत चांगली असल्याची खात्री केल्यावर वनविभाग आणि वाइल्डलाइफ एसओएसच्या पथकाने या पिल्लाला पुन्हा शेतात त्याच ठिकाणी ठेवले. तसेच त्यावर पहारा ठेवण्यास सुरुवात केली व यासाठी कॅमेरे ही बसविले. दरम्यान काही तासांनी मादी बिबट आपल्या पिल्लाचा शोध घेत त्या ठिकाणी पोचली व या पिल्लाला बॉक्समधून बाहेर काढत सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली.

Leopard Calf
Ganesh Bidkar : २५ लाख रुपये न दिल्यास बदनामी करून राजकीय जीवन उध्वस्त करून टाकू, भाजप नेते बिडकरांना धमकी

१०२ पिल्लांची आईशी भेट

गेल्या आठवड्यात अशीच एक घटना तेजेवाडी गावात घडली. अशा प्रकारच्या मोहिमेतून वन विभाग आणि वाइल्डलाइफ एसओएसद्वारे आतापर्यंत १०२ बिबट्याच्या पिल्लांची त्यांच्या आईशी भेट घडवून देण्यात आली आहे. बिबट्यांच्या संवर्धनाच्या अनुषंगाने अशा मोहिमा अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. यामुळे ही पिल्लं मोठी होऊन जंगलात बिबट्याची लोकसंख्या अबाधित राहते, तसेच पर्यावरणाचा समतोलही राखला जातो, असे वाइल्डलाइफ एसओएसचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक सत्यनारायण यांनी सांगितले.

Leopard Calf
Pune Municipal Corporation : 'मार्च एंडींग'मुळे महापालिकेच्या तिजोरीत "खणखणाट'

उसाच्या शेतात बिबट्याचे पिल्लू आढळल्याची माहिती मिळताच तत्काळ त्या ठिकाणी वन विभागाचे पथक पोहोचले. सर्व सुरक्षा उपायांचे पालन करून या पिल्लाला त्याच्या आईशी पुन्हा भेट घडवून देण्यात आली.

- अजित शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, जुन्नर

जेव्हा अशा प्रकारे बिबट्याचे पिल्लू आढळून येते तेव्हा वेळ हा अत्यंत महत्त्वाचे घटक असतो. कारण जितके जास्त पिल्लू आईशी दूर असेल तितकेच त्यांना पुन्हा एकत्र करणे कठीण होते.

- डॉ. चंदन सावने, पशुवैद्यकीय अधिकारी, वाइल्डलाइफ एसओएस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com