Leopard Cubs : मांजरी-कोलवडी शिवरस्त्यावर ऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले; नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

मांजरी खुर्द-कोलवडी शिवरस्त्यालगत मौजे कोलवडी हद्दीतील शेतात बिबट्याची तीन नवजात पिल्ले आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.
Leopard Cubs Found

Leopard Cubs Found

sakal

Updated on

मांजरी खुर्द - मांजरी खुर्द-कोलवडी शिवरस्त्यालगत मौजे कोलवडी हद्दीतील शेतात बिबट्याची तीन नवजात पिल्ले आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ऊसतोड सुरू असताना सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मजुरांना ही पिल्ले दिसून आली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात दक्षता घेण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com