पुण्यातील  तीन पुलांना केलेल्या रोषणाईचे उद्‌घाटन 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 January 2021

शहरातील यशवंतराव चव्हाण पूल (पूना हॉस्पिटलजवळ), संभाजी पूल, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलाला केलेल्या विद्युत रोषणाईचे उद्‌घाटन खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते गुरुवारी झाले.

पुणे - शहरातील यशवंतराव चव्हाण पूल (पूना हॉस्पिटलजवळ), संभाजी पूल, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलाला केलेल्या विद्युत रोषणाईचे उद्‌घाटन खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते गुरुवारी झाले. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ही कामे करण्यात आली आहेत.

पुणे: ५ हजारांची लाच घ्यायला गेली अन् महिला पोलिसच ACBच्या जाळ्यात अडकली

शहराच्या विविध भागांत सजावटीची कामे करण्यासाठी युती सरकारच्या काळात पुण्याचे पालकमंत्री असताना बापट यांनी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यातून पहिल्या टप्प्यात तीन पुलांभोवती विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उद्‌घाटनप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, नगरसेवक राजेश येनपुरे, अमोल बालवडकर, दीपक पोटे, नगरसेविका मनीषा लडकत, गायत्री खडके आदी उपस्थित होते. 

यंदाचा प्रजासत्ताक दिन परदेशी पाहुण्यांशिवाय; ५५ वर्षानंतर घडतोय नवा इतिहास!​

अख्खं गावच करावं लागलं सील; हिमाचल प्रदेशात सर्वात मोठी कारवाई​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lighting for Yashwantrao Chavan Bridge Sambhaji Bridge Maharshi Vitthal Ramji Shinde Bridge in Pune