लॉकडाउनच्या अफवेमुळे आयुष्याचे टाके उसवण्याची भीती

sewing-business
sewing-business

पुणे - लॉकडाउनमुळे गेल्या वर्षी शिलाईची कामे पूर्ण बंद झाली होती. त्यानंतर अजूनही या क्षेत्रातील व्यवसायाला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. व्यवसायातून किमान घरातील खर्च तरी भागावा, अशी अनेकांची अपेक्षा आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन झाल्यास आयुष्याचा कपड्याचे टाके उसवले जातील व ते शिवणेही आता शक्य होणार नाही, अशी भावना हे व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात छोटे-मोठे शेकडो टेलर व्यावसायिक आहेत. त्यातील बहुतांश व्यावसायिकांनी भाड्याने दुकाने घेतली आहेत. या सर्वांना लॉकडाउनची धाडकी भरली आहे. मॉल किंवा इतर दुकानातून कपडे विकत घेणाऱ्यांना आल्टर किंवा इतर गोष्टींसाठी नेहमीच टेलरची गरज भासते. प्रत्येकाच्या घरी शिलाई मशिन असेलच असे नसल्यामुळे रोजच्या वापराच्या कपड्यांची शिलाई उसवली तरी देखिल टेलरकडे जावे लागते. परंतु लॉकडाउनमुळे नागरिकांनी या गरजेला काही काळासाठी टाळले. लॉकाडउनपूर्वी शिलाईची भरपूर ऑर्डर, ग्राहक असायचे. मात्र आता पूर्वीच्या तुलनेत ५० टक्के देखील व्यवसाय होत नसल्याचे शिलाई व्यावसायिकांनी सांगितले. 

आमच्यासारख्या टेलर व्यवसायांना देखील दुकानाचे भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार, बॅंकेचे हप्ते अशा या अनेक गोष्टींचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळे लॉकडाउनऐवजी सरकारने निर्बंध लावत दुकाने सुरुच ठेवावीत.

घरातूनच काम होत असल्यामुळे कपड्यांची खरेदी, त्यांची शिलाई किंवा आल्ट्रेशनची गरज नागरिकांना पडली नाही. तसेच लग्नसराईच्या सिजनमध्ये लॉकडाउन झाल्याने गेल्या वर्षी अनेक ऑर्डर मिळाल्या नव्हत्या. गेल्या दोन महिन्यांपासून काही प्रमाणात कामाला चालना मिळाली आहे. परंतु पूर्वीच्या तुलनेत जास्त काम नाही. जेमतेम दोनवेळचे भागेल एवढीच कमाई होत आहे.
- सीमा क्षिरसागर, टेलर

शिलाईच्या व्यवसायावर कुटुंबाची सर्व जबाबदारी पार पाडत होतो. मात्र, लॉकडाउनमुळे तब्बल आठ महिने शिलाईची सर्व मोठे ऑर्डर थांबली. त्यामुळे कसे तरी उत्पन्न मिळावे म्हणून मास्कच शिवून घरातील खर्च भागविला. अजूनही म्हणावे तसे काम मिळत नसल्यामुळे आर्थिक अडचणी खूप वाढल्या आहेत. आता पुन्हा ती परिस्थिती अनुभवायची नाही.
- विजयकुमार चुंबळकर, टेलर

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com