Pune News : सीएनजीसाठी रिक्षाच्या लांबच लांब रांगा

रिक्षाचालकांचा धंदा बंद; गॅससाठी रिक्षाचालकांची वणवण
Pune News : सीएनजीसाठी रिक्षाच्या लांबच लांब रांगा
Pune News : सीएनजीसाठी रिक्षाच्या लांबच लांब रांगाsakal media

कात्रज : शनिवारी शहरातील सीएनजी गॅस पंप बंद होते. त्यामुळे रविवारी गॅस पंपावर गर्दी होणार असल्याचा अंदाजाने रिक्षाचालकांनी गॅस भरण्यासाठी पहाटे पाच वाजल्यापासून गॅस एजन्सीच्या बाहेर लांबच्या लांब रांग लावल्या होत्या. मात्र, दोन-अडीच तास रांगेत रिक्षा लावूनही रिक्षाचालकांचा हिरमोड झाला. रविवारीही सकाळी काही काळ सोडला तर गॅस पंप बंदच राहिले.

Pune News : सीएनजीसाठी रिक्षाच्या लांबच लांब रांगा
IPL 2022 : मेगा लिलाव अन् खेळाडूंच्या रिटेन संदर्भात सर्व काही

गॅस पंप बंद असल्याने राजाराम गॅस एजन्सीपासून सातारा रस्त्यापर्यंत लांबच्या लांब रिक्षाचा रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. सकाळी ११च्या सुमारास गॅसपंप व्यवस्थापकांकडून गॅसची लाईन बंद झाली असून पुन्हा गॅसलाईन कधी चालू होईल याचा अंदाज नाही. त्यामुंळे रांगेत थांबू नका असे सांगण्यात आले. मात्र, रांगेत थांबलेल्या रिक्षांमुळे कात्रज प्राणीसंग्रहालयाकडून भारती विद्यापीठकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सकाळी गॅस न मिळाल्याने उंड्री-पिसोळी, हांडेवाडी परिसरात असणाऱ्या गॅस पंपावर जाऊनही पाहिले. पंरतु, त्या भागातीलही पंप बंद आहेत. त्यामुळे गॅस मिळाला नसल्याचे त्रिमूर्ती चौकातील रिक्षाचालक फारुख शेख यांनी सांगितले.

मुंबईहून पुण्याला गॅस वाहतूक करणाऱ्या गेल (गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड) या कंपनीचे वार्षिक देखभाल दुरुस्तीचे काम चालू आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून पुण्यातील पंपावर गॅसचा तुटवडा आहे. देखभाल दुरुस्तीचे काम आज रात्रीपर्यंत होणे अपेक्षित आहे. बिबवेवाडीची गॅसलाईन फुटल्याने हा तुटवडा निर्माण झालेला नाही. तो योगायोग आहे. तसेच, ग्राहकांमध्ये गॅसच्या किमती वाढणार असल्याने पंपचालकांनी गॅस देणे बंद केले असल्याचा गैरसमज आहे. परंतु दराचा आणि गॅस पुरवठा खंडित होण्याचा संबंध नाही. उद्या सकाळपर्यंत गॅसपुरवठा सुरळित होईल अशी माहिती ऑल इंडिया पेट्रोल डिझेल असोशिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते अली दारूवाला यांनी सांगितले.

Pune News : सीएनजीसाठी रिक्षाच्या लांबच लांब रांगा
नाशिकची महिला क्रिकेटपटू माया सोनवणेची चॅलेंजर ट्रॉफीसाठी निवड

"काल दुपारपर्यंत गॅस होता. त्यावर रिक्षा चालवली. गॅस संपत आल्यावर रिक्षा बंद केल्याने धंदा बुडाला. आजही तीच परिस्थिती आहे. सकाळी पाच वाजल्यापासून गॅससाठी लाईन आहे. मी दोन तास रांगेत उभे राहूनही गॅस मिळाला नाही. गॅस व्यवस्थापकांकडून लवकर गॅस मिळेल असे सांगण्यात आले होते. परंतु गॅस मिळालाच नाही."

- अनिल डोईफोडे, रिक्षाचालक, कात्रज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com