लोणी काळभोर, उरुळी कांचन, वाघोलीचे सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले

लोणी काळभोर, उरुळी कांचन, वाघोलीचे सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले

लोणी काळभोर (पुणे) : हवेली तालुक्यातील 89 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत पुण्यात पार पडली. प्रसिध्द असणाऱ्या लोणी काळभोर, उरुळी कांचन, कदमवाकवस्ती, वाघोली या सारख्या तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीचे सरपंचपद आजच्या आरक्षण सोडतीत सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाल्याचे आढळून आले आहे.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वीसहून अधिक ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाल्याने सरपंचपद आपल्याच घऱात यावे यासाठी अऩेक मात्तबर पैसेवाले निवडणुकीच्या रिंगणार उतरणार असल्याने, आगामी ग्रामपंचायतीच्या वेळी मतदारांची चांगलीच दिवाळी होणार आहे.

लोणी काळभोर, उरुळी कांचन, कदमवाकवस्ती, वाघोली, मांजरी बुद्रुकसह हवेली तालुक्यातील 89 ग्रामपंचातीच्या सरपंपचपदासाठीची आरक्षण सोडत हवेली पंचायत समितीच्या महात्मा गांधी सभागृहात मंगळवारी पार पडली. हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, हवेलीचे तहसिलदार सुनिल कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या आरक्षण सोडतीत 45 ग्रामपंचायतीवर महिला राज येणार असल्याचे स्पष्ठ झाले. आरक्षण सोडतीत आपल्या गावच्या सरपंचपदी नेमकी कोणाची वर्णी लागतेय हे पाहण्यासाठी तालुक्यातील विविध ग्रामपंचायत हद्दीतील अऩेक इच्छुक जातीने हजर होते. 

लोणी काळभोर, खडकवासला, वाघोलीसह हवेली तालुक्यातील पन्नासहुन अधिक ग्रामपंचायती पुणे शहरालगत असल्याने, या ग्रामपंचायतीचा सरपंच होणे ही बाब राजकीय दृष्ट्र्या भुषनावह मानली जाते. यामुळे या ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवण्यासाठी साम, दाम व दंड या त्रिसुत्रीचा वापर नेहमीच केला जाते ही बाब लपुन राहिलेली नाही. शहरालगत वाढलेली गुठे्वारी, बेकायदा बांधकाम व त्यातुन मिळणारा पैसा व सन्मान यासाठी स्थानिक नेते वाट्टेल ते करत असल्याचे दिसून येत आहे. मागील पंधऱा वर्षापासून शहरालगतच्या ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवण्यासाठी कोट्यावधी रुपयांची उधळण केली जात आहे. याचमुळे  मागील महिनाभऱापासून सरपंचपदाच्या आरक्षणाची आतुरतेने वाट पहीला जात होती. 

दरम्यान आजच्या आरक्षण सोडतीत लोणी काळभोर, उरुळी कांचन, खडकवासला, सोरतापवाडी, पिसोळी, किरकट्वाडी, वडाची वाडी, शेवाळवाडी, मणेरवाडी, थेऊर, वढु खुर्द, उरुळीकांचन, देहू, कदमवाकवस्ती, वाघोली, लोणी काळभोर, आंबी, मांजरी खुर्द या प्रमुख ग्रामपंचातीचे सरपंच खुले झाल्याने, या भागातील अनेत मातब्बर घऱाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. स्वतःला शक्य नसल्यास, पत्नी, भाऊ अथवा वहिनी अशांणा निडणुकीच्या रिंगणात उतरवून सत्ता आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळण करणार आहेत. उरुळी कांचनचे सरपंच खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्याचे लक्षात येताच, एक माजी सरपंच व दोन माजी सरपंचानी तात्काळ आपल्या पत्नींना फोन करुन, सरपंचपदाच्या शुभेच्छाही देऊऩ टाकल्या आहेत. 

ग्रामपंचायत निहाय आरक्षण पुढील प्रमाणे 

सर्वसाधारण:- नांदेड, मांडवी बुद्रुक, देहू, कदमवाकवस्ती, रहाटवडे, पेठ, फुलगाव, नाव्ही-सांडस, शिंदेवाडी, कोरेगाव मूळ, तरडे, सांगवी-सांडस, नायगाव, होळकरवाडी, शिवापूर, वडगाव- शिंदे, वळती, वाघोली, लोणी काळभोर, आंबी, मांजरी खुर्द, शिरसवडी, भवरापूर, केसनंद.

अनुसूचित जाती महिला:- खानापूर, मांडवी-खुर्द, आगळंबे, डोंगरगाव, तुळापूर, कुडजे, बकोरी, खामगाव टेक.

*अनुसूचित जाती:- वडकी, कुंजीरवाडी, वरदाडे, आव्हाळवाडी, आळंदी म्हातोबा, जांभुळवाडी-कोळेवाडी, सांगरून, घेरासिंहगड.

*नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला:- मालखेड, पेरणे, अष्टापुर, सोनापूर, नांदोशी, बुर्केगाव, लोणीकंद, निरगुडी, गोगलवाडी, कोंढणपूर, शिंदवणे, मांजरी बुद्रुक.

*नागरीकांचा मागास प्रवर्ग:- औताडे-हांडेवाडी, आर्वी, गाऊडदरा, खेड-शिवापूर, प्रयागधाम, नऱ्हे, श्रीरामनगर, बहुली, हिंगणगाव, खडकवाडी, कोलवडी-साष्टे, जांभळी.

*सर्वसाधारण महिला:- डोणजे, भावडी, खामगाव मावळ, गाऱ्हे खुर्द, मांगडेवाडी, कल्याण, खडकवासला, सोरतापवाडी, पिसोळी, किरकट्वाडी, वडाची वाडी, न्यू कोपरे, गुजर निंबाळकरवाडी, पिंपरी सांडस, कोंढवे-धावडे, भिलारेवाडी, अहिरे, वाडेबोल्हाई, गोऱ्हे बुद्रुक, बिवरी, शेवाळवाडी, मणेरवाडी, थेऊर, वढु खुर्द, उरुळीकांचन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com