शतप्रतिशत पुण्यात भाजपला मोठा धक्का; आघाडीची ताकद वाढली | Election Results 2019

Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Pune trends morning
Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Pune trends morning

विधानसभा 2019 :

पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणी आज (गुरुवारी) सकाळी आठ वाजता सुरूर झाली. पुणे शहराचे चित्र पाहता सकाळी 11 वाजेपर्यंत कोथरूडमधून चंद्रकांत पाटील, पर्वतीमधून माधुरी मिसाळ, कसब्यातून मुक्ता टिळक, खडकवासल्यातून भिमराव तापकीर, शिवाजीनगरमधून सिद्धार्थ, कॅन्टोनमेंटमध्ये सुनिल कांबळे, वडगाव शेरीमध्ये सुनिल टिंगरे आघाडीवर आहेत. 

जिल्ह्याचे चित्र

जिल्ह्यात दौंडमधून राहुल कुल, बारामतीतून अजित पवार , पुरंदरमधून विजय शिवतारे, इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील आघाडीवर आहेत. तर भोरमधून काँग्रेसचे संग्राम थोपटे, आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील, जुन्नरमध्ये अतुल बेनके, खेड आळंदीमध्ये दिलीप मोहिते, शिरूरमधून अशोक पवार आघाडीवर आहेत. मावळमधून सुनिल शेळके आघाडीवर आहेत. 

पिंपरी चिंचवड

पिंपरीत शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार, भोसरीत भाजपचे महेश लांडगे, तर  चिंचवडमध्ये भाजपचे लक्ष्मण जगताप आघाडीवर आहेत.  

मतदान केंद्र आणि उमेदवारांची संख्या पाहता कसबापेठ विधानसभा मतदारसंघाचा निकाल दहा वाजेपर्यंत लागण्याची शक्‍यता आहे. तर भोर मतदारसंघात सर्वाधिक मतदान केंद्र असल्याने या ठिकाणी निकालाला थोडा वेळ लागण्याची शक्‍यता आहे. साधारपणे दुपारी बाराच्या दरम्यान सर्व निकाल हाती येतील, असे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

पुण्यातील बिग फाईट
पुण्यातील सर्वाधिक लक्ष असलेला मतदारसंघ म्हणजे कोथरूड. भाजपचे चंद्रकांत पाटील व मनसेचे अॅड. किशोर शिंदे यांच्यात काँटे की टक्कर होईल. तर बारामतीत भाजपच्या गोपिनाथ पडळकर यांनी अजित पवारांना आव्हान दिले आहे. इंदापूरात राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे विरूद्ध भाजपचे हर्षवर्धन पाटील अशी हाय व्हॉल्टेज लढत होईल. तर मावळातल्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ही लढत भाजपचे बाळा भेगडे व भाजपमधून नाराज होऊन राष्ट्रवादीत गेलेल्या सुनिल शेळके यांच्यात होईल.  

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात 246 उमेदवार आहेत. शहरातील मतदानाचा टक्का घसरला आहे. तर ग्रामीण भागात मात्र मतदानाच्या टक्केवारी अधिक आहे. पुणे शहरातील कसबा पेठ, वडगावशेरी, पर्वती, हडपसर, पुणे कॅंटोन्मेट, कोथरूड, शिवाजीनर आणि खडकवासला या आठ मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील धान्य गोदाम येथे होणार आहे. तर पिंपरी - चिंचवड शहरातील तीन मतदारसंघांतील मतमोजणी बालेवाडी येथील क्रीडा संकुल येथे होणार आहे. ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी संबंधित तालुक्‍याच्या ठिकाणी होणार आहे. 

मतमोजणीच्या सुरवातीला सकाळी सात वाजता प्रथम टपाली मतांची मोजणी केली जाणार आहे. टपाली मते मोजणीसाठी स्वतंत्र टेबल ठेवली जाणार आहेत. त्यानंतर आठ वाजता इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांवरील (इव्हीएम) मोजणी सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघात 14 ते 22 टेबल ठेवण्यात आली आहेत. या टेबलवर एकावेळी एक इव्हीएममधील मतांची मोजणी केली जाणार आहे. 

कसबा पेठ, शिवाजीनगर आणि पुणे कॅंटोन्मेट विधानसभा मतदारसंघात 14 टेबल असून मतमोजणीच्या 20 फेऱ्या होणार आहे. खडकवासला आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राची संख्या जास्त असल्याने याठिकाणी 23 फेऱ्या होणार आहेत. वडगावशेरी आणि पर्वतीमध्ये 22, कोथरुडमध्ये 21 फेऱ्या होणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com