esakal | महावितरणचे झाले कोट्यवधी रुपयांचे नुकसान; कसे ते वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavitaran

नवीन वीजजोडासाठी नियामक आयोगाने सात हजार १५० रुपये दर निश्‍चित करूनही महावितरण यासाठी वर्षभर केवळ तीन हजार शंभर रुपये आकारत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकाराला जबाबदार कोण, असा प्रश्‍न उपस्थितीत झाला आहे.

महावितरणचे झाले कोट्यवधी रुपयांचे नुकसान; कसे ते वाचा

sakal_logo
By
उमेश शेळके

पुणे - नवीन वीजजोडासाठी नियामक आयोगाने सात हजार १५० रुपये दर निश्‍चित करूनही महावितरण यासाठी वर्षभर केवळ तीन हजार शंभर रुपये आकारत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकाराला जबाबदार कोण, असा प्रश्‍न उपस्थितीत झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महावितरणने सादर केलेल्या आणि आयोगाने मान्यता दिलेल्या प्रस्तावाची छाननी केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहेत. आयोगाने यापूर्वी म्हणजे मार्च २०२० पर्यंत ०.५ ते ७.५ किलो वॉटपर्यंतच्या सिंगल फेज (भूमिगत) नवीन सर्व्हिस कनेक्‍शनसाठी ७ हजार १५० रुपये दर निश्‍चित करून दिला होता. दरम्यान, मार्चनंतर  त्यामध्ये ८८० रुपयांनी वाढ प्रस्तावित करून ८ हजार ३० रुपये करण्यास महावितरणने आयोगाकडे परवानगी मागितली होती. आयोगाने ती नाकारत ७ हजार ६०० रुपये आकारण्यास मान्यता दिली आहे. 

पुण्यातील 'हा' भाग झाला कोरोनामुक्त

प्रत्यक्षात मात्र महावितरणकडून मार्च २०२० पूर्वी वीजजोड देताना केवळ ३ हजार १०० रुपयेच आकारणी केली. एवढेच नव्हे, तर ग्राहकांनी हे काम मान्यताप्राप्त ठेकेदाराकडून करून घेतल्यास वीजजोडाचे शुल्क आणि त्यावर १८ टक्के जीएसटी मिळून जी रक्कम येते, त्यावर १.३ टक्के शुल्क आकारले जाते. हे शुल्क देखील ७.५ किलो वॉटच्या जोडणीसाठी ३ हजार १०० रुपये ग्राह्य धरून आकारले असल्याचे समोर आले आहे. 

हवेलीकरांच्या काळजीत पडली भर; तालुक्‍यातील २० गावे होणार सील!

यावरून मार्चपूर्वी प्रत्येक वीजजोडासाठी महावितरणकडून ४ हजार ५० रुपये कमी शुल्क आकारल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. एकीकडे तूट भरून काढण्यासाठी दरवाढीची मागणी करणारे महावितरण दुसरीकडे मान्यतेपेक्षा कमी शुल्क आकारणी कशी करू शकते, ही चूक कोणाची, याला जबाबदार कोण, त्यावर काय कारवाई करणार, असे अनेक प्रश्‍न या निमित्ताने उपस्थितीत झाले आहेत. 

कुठे झाली चूक?
मार्चपूर्वी ०.५ किलो वॉट सिंगल फेज वीजजोडासाठी ३ हजार १०० रुपये दर निश्‍चित केला होता. त्यास आयोगाने देखील मान्यता दिली होती. तर ०.५ ते ७.५ किलो वॉटसाठी ७ हजार १५० दरास मान्यता दिली होती. प्रत्यक्षात महावितरणकडून नवीन सर्व्हिस कनेक्‍शन देताना ०.५ किलो वॉटचा जो दर आयोगाने निश्‍चित केला होता, तोच दर ७.५ किलो वॉटपर्यंतच्या सिंगल फेज जोडासाठी वापरण्यात येत होता.  

खडकवासला गाव 'एवढे' दिवस राहणार बंद

सर्व्हिस कनेक्‍शनचे दर निश्‍चित केलेले आहेत. त्याच दरानुसार आकारणी झाली आहे की नाही, याची तपासणी करण्यात येईल. त्यामध्ये काही त्रुटी असतील, तर योग्य ती कारवाई केली जाईल. 
- पंकज तगलपल्लेवार, अधीक्षक अभियंता, महावितरण 

महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना शिवसेनेतर्फे निवेदन
पुणे - इलेक्‍ट्रिसिटी ड्यूटी माफ करावी, ग्राहकांना पाच महिन्यांचे बिल विभागून द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी शहर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळात सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, शाम देशपांडे, प्रशांत बधे, विशाल धनवडे, गजानन पंडित आदी सहभागी झाले होते. त्यावर तालेवार म्हणाले,‘‘ वीज नियामक आयोगाने मान्यता दिलेल्या दरानुसार वीजबिल पाठविले आहे. यापूर्वी ज्यांनी बिले भरली आहेत. ती रक्कम त्यातून वजा करण्यात येईल. चुकीची बिले ग्राहकांना गेली असतील, तर ती दुरुस्त करून दिली जातील.’’

loading image