मकरसंक्रातीनिमित्त पंगत उडविणाऱ्यांनो सावधान... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kite flying

मकरसंक्रातीनिमित्त पंगत उडविणाऱ्यांनो सावधान...

उंड्री : मकरसंक्रांतीच्या सणाची (Makar Sankrati) चाहुल लागताच उपनगर आणि परिसरात ठिकठिकाणी रंगीबेरंगी पतंग (kite flying) आणि नायलॉनच्या मांजाची विक्री सुरु होते. मात्र, पतंगासाठी वापरला जाणारा मांजा, पक्षी, नागरिक-दुचाकीचालकांच्या जीवाला धोकादायक ठरत आहे. मागील काही वर्षात मांज्याच्या फास लागल्याने अनेक लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे पतंगप्रेमींनी पतंग उडविताना सावधानता बाळगावी, असे सूज्ञ नागरिकांनी सांगितले.

हेही वाचा: सोलर पॅनल स्वच्छतेची चिंता नको, तरुणानं तयार केलीय भन्नाट यंत्रणा

नायलॉनच्या मांज्याचा सर्वाधिक धोका उड्डाण पुलावर असलेला दिसून आला आहे. हांडेवाडी रोड, सातवनगर, उंड्री, पिसोळी, हांडेवाडी, वडाचीवाडी, वडाचीवाडी इत्यादी ठिकाणी मांज्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. पतंगासाठी मांज्या अनेकदा तुटून झाडे, इमारती, उड्डाण पूल अश्या ठिकाणी अडकून पडल्याने पक्ष्यांनाही दुखापत होऊन जीव गमवावा लागतो.

हेही वाचा: ढाका आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत परभणीची ज्योती गवते द्वितीय

उपनगर आणि लगतच्या गावात नायलॉनसह अधिक घाताक असलेल्या मांज्याची विक्री करण्यास बंदी आहे. अश्या प्रकारच्या मांज्याची विक्री करताना तसेच साठवणूक करताना कोणी आढळून आल्यास त्याच्यावर करवाई केली जाणार आहे. इतकाच नव्हे, तर या प्रकारच्या मांज्याची खरेदी करणाऱ्या नागरिकांवरही कारवाई केली जाणार आहे. उपनगरालगतच्या गावात नायलॉनसह अधिक घाताक असलेल्या मांज्याची विक्री करण्यास बंदी आहे. अश्या प्रकारच्या मांज्याची विक्री करताना तसेच साठवणूक करताना कोणी आढळून आल्यास त्याच्यावर करवाई केली जाणार आहे. इतकाच नव्हे तर या प्रकारच्या मांज्याची खरेदी करणाऱ्या नागरिकांवरही कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top