Ajit Pawar : माळेगाव नगपंचायत शहर पर्यटनाचे नविन केंद्र बनविण्याचा संकल्प ; अजित पवार

हे होत असताना समोरच्या उमेदवाराने (सुप्रिया सुळे) केंद्रातून किती निधी आणला, हेच कळत नाही.
अजित पवार
अजित पवारesakal

माळेगाव : `बारामती शहराच्या तुलनेत माळेगाव बुद्रूक नगपंचायत हे शहरसुद्धा पर्य़टनाचे नविन केंद्र बनविण्याचा माझा संकल्प आहे. सुरवातीच्या टप्प्यात या नगरपंचायतीला मुलभूत सेवासुविधांसाठी शासनस्तरावर ३५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यापुढील कालावधीत माळेगाव प्रशासकिय इमारत, प्रशस्त रस्ते, उद्यान, सांडपाण्याची व्यवस्था, आरोग्य आणि दिबाबत्तीसाठी शेकडो कोटींचा निधी महाराष्ट्र सरकार मंजूर करेल.माळेगाव हा सर्वांगिण विकास साधण्यासाठी लोकसभा निवडणूकीत घड्याळ चिन्हाला सर्वाधिक पसंती मिळाली पाहिजे,` असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

अजित पवार
Nashik Crime News : अंबडमध्ये घरात सापडला गांजाचा साठा; संशयिताला अटक

बारामती लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माळेगावात कार्य़कर्त्यांशी संवाद साधला. पुर्वी पवारसाहेब आणि आपण एकत्र निवडणूका लढत होतो. यंदा चित्र वेगळे आहे, असे सांगून अजित पवार म्हणाले,`` बारामतीच्या राजकारणात मी आजवर पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे काम केले. बारामती तालुक्याचा सर्वांगिण विकास राज्यात प्रथम क्रमांकाचा केला. हे होत असताना समोरच्या उमेदवाराने (सुप्रिया सुळे) केंद्रातून किती निधी आणला, हेच कळत नाही.

अजित पवार
Jalgaon News : प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्या चौदाशे कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’; जळगाव-रावेर मतदारसंघ

निवडणूकीच्या तोंडावर त्यांनी जे पुस्तक प्रकाशित केले आहे, त्या पुस्तकात बारामतीमधील विकास कामांचे फोटो टाकले आहेत. वास्तविक ही सर्व विकास कामे होण्यासाठी आणि निधी उपलब्धतेसाठी मी जिवाचे रान केल्याचे तुम्ही पाहिले आहे. ही विकास कामे होताना मराठा, मुस्लिम, दलित, मातंग आदी जाती धर्मातील लोकांना न्याय देण्याचा प्रय़त्न केला. त्यामध्ये माळेगाव नगरपंचायत हद्दितील नागरिकही मागे राहिलेले नाहीत. या लोकाभिमूक कामाच्या जोरावर घड्याळ मतदारांच्या पसंतीस उतरले असे मला वाटते.``

अजित पवार
Jalgaon News : कॉंग्रेसची जिल्हा कार्यकारिणी जाहीर! 29 उपाध्यक्ष, 42 सरचिटणीस, 51 चिटणीस

माळेगावातील गोरगरीबांची मुले शिक्षण घेत असलेल्या शुंभूसिंह महाराज हायस्कूलची सुधारणा करायची आहे, असे सांगून पवार म्हणाले,`` माळेगावमध्ये राजकारण खूप आहे. हे राजकारण बाजूला सारून आपल्याला शंभूसिंह महाराज हायस्कूल अद्ययावत उभारायचे आहे. हे काम होण्यासाठी माझी कोणतीही अपेक्षा नाही अथावा माझ्या नावाची पाटीही लावू नका. परंतु तुम्ही लोकांनी या कामात सहकार्य़ करावे. याशिवाय गावात प्रशस्त मुख्य रस्ते उभारले जात आहेत. या रस्त्याच्या बाजूला सर्व्हिस रस्ते प्रस्तावित आहेत. त्यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य करावे. रस्त्यालगत बांधकाम करताना विचार करावा,`` असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, बारामती पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश गोफणे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांने घेतलेली भूमिका योग्य असल्याचे सांगितले.

सीएसआर फंडातून सोलर पॅन...

माळेगावातील दिवाबत्ती आणि पाणी पुरवठा योजनांसह विविध गोष्टींसाठी आवश्यक असलेली वीज सोलर पॅनच्या माध्यमातून उपलब्ध करायची आहे. त्यानुसार माळेगावात सीएसआर फंडातून हे सोलर पॅन उभारायचे नियोजन केले आहे, अशी माहिती अजित पवार यांनी स्पष्ट केली. तसेच त्यांनी माळेगाव परिसरात साखर कामगारांनाही कमी जागेत आधिक चांगल्या निवासी इमारती उभारायचे निश्चित झाल्याचे सांगितले. माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप यांनीही याकामी सहकार्य़ करणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com