Accident News: पुणे-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, ५ जण गंभीर जखमी

नाशिकवरुन भोसरीच्या दिशेने जात असताना जीपने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली यामुळे हा भीषण अपघात झाला
Accident News
Accident NewsEsakal

गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशातच पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ट्रक आणि जीपमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंचर जवळ पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. नाशिकवरुन भोसरीच्या दिशेने जात असताना जीपने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली यामुळे हा भीषण अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की जीपच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

Accident News
Mumbai Crime : वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसाला मोटारगाडीची धडक, हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

रस्त्यावर दाट धुके असल्यामुळे समोरील ट्रकचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. अपघातात जीपमधील एकच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देखील समोर आहेत.

Accident News
Uttarkashi Tunnel Rescue: अंघोळ, जेवण,टॉयलेट...बोगद्यात अडकल्या नंतरचे ते १७ दिवस कसे होते? मजूरांनी सांगितली आपबिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com